Kishore Khatri murder case: बहुचर्चीत किशोर खत्री हत्याकांड मधील फरार कैदी जस्सी तीन वर्षानंतर पोलिसांच्या जाळ्यात; मध्यप्रदेशातून केली अटक




भारतीय अलंकार 24

अकोला: बहुचर्चीत किशोर खत्री हत्याकांड मधील जन्मठेप झालेल्या पॅरोल रजेवरून ०३ वर्षापासुन फरार असलेला कैदी जसवंतसिंग उर्फ जस्सी यास शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडून मध्यप्रदेश राज्यातुन अटक करण्यात आली आहे.


दि. ०३/११/२०१५ रोजी ग्राम हिंगणा शिवारात रंजीतसिंग गुलाबसिंग चुंगडे याने त्याचा साथीदार जसवंतसिंग उर्फ जस्सी उदयसिंग चौव्हान याचे सोबत मिळुन अकोल्यातील व्यवसायिक किशोर खत्री यांची निर्घुन हत्या केली होती. त्याबाबत पोलीस स्टेशन जुने शहर येथे अपराध क्र. १६९/२०१५ कलम ३०२, २०१, ३४ भा. दं. वि. सहकलम ३, २५ आर्म अक्ट अन्वये गुन्हा नोंद होता. सदर हत्या कांडातील आरोपी यांना  जिल्हा सत्र न्यायालय अकोला यांनी दि. २७/०९/२०१८ रोजी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सदर शिक्षा भोगत असताना कोवीड संसर्गजन्य रोगाचे साथी दरम्यान सन २०२० मध्ये कैदी जसवंतसिंग उर्फ जस्सी उदयसिंग चौव्हान हा पॅरोल रजेवर जिल्हा कारागृहातुन सुटुन आला होता. त्यानंतर तो कारागृहात परत गेला नाही. दि. २९/०७/२०२० पासुन तो फरार होता. त्यामुळे त्याचे विरुध्द पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे अप क्र. २७३ / २०२० कलम २२४ भा. दं. वि. प्रमाणे गुन्हा नोंद करून त्याचा शोध सुरू होता.


सदर प्रकरणात  उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक अकोला यांना फरार कैदी जसवंतसिंग उर्फ जस्सी उदयसिंग चौव्हान याचा विशेष पथक स्थापन करून शोध घेण्याबाबत व त्यासाठी काय प्रयत्न केले, याबाबत अहवाल मागितलेला होता. त्या अनुषंगाने  पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी पो. नि. शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांना फरार कैदी जसवंतसिंग उर्फ जस्सी उदयसिंग चौव्हान याचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या.


त्यानुसार पो. नि. शंकर शेळके यांनी स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील अधिकारी स. पो. नि. कैलास भगत व पो.उप.नि. गोपाल जाधव तसेच सायबर सेल मधील अंमलदार आशिष आमले, राहुल गायकवाड यांना अत्यंत गोपनिय पध्दतीने गुप्त बातमीदार नेमुन व तांत्रीक विश्लेषन करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गेल्या दोन महिन्यापासुन फरार कैदी जसवंतसिंग उर्फ जस्सी उदयसिंग चौव्हान याचा हालचाली बाबत माहिती घेवुन पाठपुरावा सुरू होता. त्याबाबत वेळोवेळी पोलीस अधिक्षक यांना तोंडी प्रगती अहवाल देण्यात येत होता. फरार कैदी जसवंतसिंग उर्फ जस्सी हा पोलीस खात्यात नौकरीवर असल्याने त्याला कायदयाची पुर्ण माहिती असल्याने फरार राहण्याबाबतची योग्य ती दक्षता तो घेत होता. म्हणुनच त्याला पकडणे हे पोलसांन समोर एक आव्हान होते.


दि. १९/१०/२०२३ रोजी पो. नि. शंकर शेळके यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी मिळाली कि, पॅरोल रजेवरून फरार कैदी जसवंतसिंग उर्फ जस्सी हा मध्यप्रदेश येथील बु-हानपुर, मध्यप्रदेश येथे हजर असल्याची माहिती मिळाली. तेव्हा तात्काळ पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शन व परवानगीने पो.उप.नि.गोपाल जाधव यांचा नेतृत्वात एक पथक ब-हानपुर मध्यप्रदेश येथे रवाना केले. तेथे पोहचुन योग्य ती दक्षता घेवुन सापळा रचुन न्यामतपुरा, बु-हानपुर भागातुन फरार कैदी जसवंतसिंग उर्फ जस्सी उदयसिंग चौव्हान यास ताब्यात घेण्यात आले. त्यास पुढील कारवाई करिता पो.स्टे. जुने शहर अकोला यांचे ताब्यात देण्यात आले.


सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक संदिप घुगे , अपर पोलीस अधिक्षक  अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला, स. पो. नि. कैलास भगत, पो.उप.नि. गोपाल जाधव, पोलीस अंमलदार उमेश पराये, खुशाल नेमाडे, धिरज वानखेडे, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर, राहुल गायकवाड व चालक प्रशांत कमलाकर व सायबर सेल येथिल पो.शि. आशिष आमले यांनी ही कारवाई केली. सदर कारवाई साठी पथकातील कर्मचा-यांना पो. स्टे. मुक्ताईनगर येथील पोलीस अंमलदार रविंद्र चौधरी यांनी आवश्यक ते सहकार्य केले.

टिप्पण्या