court news: प्रा. रंजीत इंगळे खून प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला; प्रेम प्रकरणात अडसर ठरत असल्याने केला खून





भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोल्यातील वधू-वर परिचय मेळाव्याचे संयोजक व सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक रंजीत इंगळे यांच्या खून प्रकरणातील आरोपी सचिन भाग्यवान चक्रनारायण (रां. शिवणी) याचा जामीन अर्ज  अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील पाटील यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला आहे.




प्रकरण असे की, 17 जून 2023 रोजी प्राध्यापक इंगळे हे आपले कामकाज आटोपून घरी जात असताना वाशिम बायपास चौकातील हुसेनी शॉपच्या समोर रात्री साडेअकरा वाजता अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारून त्यांची निर्घृण हत्या केली होती. आरोपीचा कोणताही थांगपत्ता नसताना  जुने शहरचे तात्कालीन ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी सीसीटीव्ही फुटेज चा आधार घेत मुख्य आरोपी पर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा करून दिला होता. 



सेवानंद वानखडे यांची बदली झाल्यानंतर नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक लेवरकर यांनी पुढील तपास केला आणि या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आणि या फुटेजचा आधार घेत त्यांनी आरोपीला एक महिन्यानंतर दिल्ली येथून अटक केली. 



आरोपी सचिन भाग्यवान चक्रनारायण हा सैनिक असून दिल्ली येथे कार्यरत आहे. याचे याच गावातील अनिता नामक एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. या दोघांच्या प्रेम प्रकरणांमध्ये रणजीत इंगळे अडसर ठरत होता, त्यामुळे आरोपीने त्याचा निर्गुण खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 



आरोपी घटनेपासून तुरुंगात असल्यामुळे त्याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता,  मात्र आरोपीला जामीन देण्यास सरकारी वकीलानी आक्षेप नोंदवला. आरोपीला जामीन देऊ नये त्याने कट रचून पूर्वनियोजितपणे अपंग व्यक्तीचा खून केला ही बाब समाजाच्या आणि कायद्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. अशा आरोपीला जामीन दिल्यास लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडेल, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला होता. आरोपीचा या घटनेची संबंध नाही असा युक्तिवाद ॲड.युसुफ नौरंगाबादे यांनी केला होता. संपूर्ण घटना क्रमामध्ये आरोपीचा चेहरा दिसत नाही असा त्यांचा बचाव होता,  मात्र त्यांचा बचाव न्यायालयाने अमान्य केला. आरोपी सचिन भाग्यवान चक्रनारायण हा खून करण्याच्या हेतूनेच दिल्लीवरून अकोल्यात दाखल झाला होता व रेल्वे स्टेशन रोडवरील एका हॉटेलमध्ये रूम घेऊन राहत होता. घटनेच्या दिवशी त्यांने प्रा इंगळे यांचा कसा कसा पाठलाग करून खून केला याचे संपूर्ण चित्रण सीसीटीव्ही मध्ये असून ते न्यायालयात सादर करण्यात आले आहे. सरकार तर्फे ॲड. आनंद गोदे, ॲड. सुभाष काटे काम पाहत आहेत.


टिप्पण्या