court news: खुनाच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

.            आरोपी तर्फे वकील 



भारतीय अलंकार 24

अकोला: बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत सन २०२२ मध्ये घडलेल्या एका खून प्रकरणातील आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.




हकीकत अशा प्रकारे आहे की, दि. २८/०२/२०२२ रोजी आपोती बु गावा जवळील जिन जवळ गोपाल पुरूषोत्तम डांगरे याची हत्या जितेंद्र उर्फ देवानंद सनगाळे रा. सुलतान अंजनपुर ता.जि. अकोला, आकाश पुंडलिक मोरे, रा. ग्राम घुसर तथा त्यांचा एक मित्र यांनी केल्याबाबतची तकार फिर्यादी शिवदास श्रीराम तराळे यांनी बोरगांव मंजु पोलीस स्टेशन येथे केली होती, त्यावर भादंवि चे कलम ३०२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास पी. एस. आय. संजय शिरसाट यांनी करून न्यायालयात त्याबाबतचे दोषारोपपत्र दाखल केले होते. 



या प्रकरणाची सुनावणी प्रमुख सत्र न्यायाधिश सुवर्णा केवले यांचे न्यायालयात झाली. या प्रकरणात सरकार पक्षा तर्फे एकुण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्या दरम्यान आरोपीच्या वकीलांनी साक्षीदार यांचे बयाणात आलेली तफावत व उणीवा युक्तीवादा दरम्यान न्यायालयाचे निदर्शनास आणुन दिले. व दोन्ही पक्षांचे युक्तीवाद ऐकुन व सरकार पक्ष आरोपी विरूध्द सबळ पुराव्यानिशी आरोप सिध्द करू शकले नाही, असे निष्कर्ष काढुन  न्यायालयाने आरोपी (१) जितेंद्र उर्फ देवानंद सुरेश सनगाळे (२) आकाश पुंडलिक मोरे (३) शुभम गौतम आठवले यांची निर्दोष मुक्त केले. 



या प्रकरणा मध्ये आरोपी क्रमांक १ तर्फे ॲड. अली रजा खान, ॲड. अय्युब नवरंगाबादे व आरोपी क्र. २ तर्फे ॲड. दिलदार खान, व आरोपी क्र. ३ तर्फे ॲड. मोहन मोयल यांनी बाजु मांडली.

टिप्पण्या