court news:किशोरी आमले हत्याकांड प्रकरणातील आरोपी आईला जामीन मंजूर

.             ॲड. पप्पू मोरवाल


भारतीय अलंकार 24

अकोला: बहुचर्चित किशोरी आमले या पाच वर्षीय चिमुरड्या मुलीच्या हत्या प्रकरणातील आरोपी विजया आमले हिला न्यायलयाने जामीन मंजुर केला आहे. आरोपी ही मृतक मुलीची आई आहे.



पोलीस स्टेशन खदान अकोला येथे दिनांक 02/06/2023 रोजी पोलीस चौकी GMC अकोला येथून नापोका 1922 विजय चव्हाण यांनी ऑवन्स क्रमांक 271 /2023  प्रमाणे आनुन दाखल केला, की यातील मृतक नामे कु. किशोरी रवि आमले वय 5 वर्ष रा. बलोदे ले-आउट हिंगणा फाटा अकोला हिला तिचे नातेवाईकांनी उपचाराकरीता शासकीय सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे भरती केले असता, तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. अशा आक्रन्स वरुन पोस्टे खदान येथे मर्ग क्रमांक 41 / 2023 कलम 174 जा. फौ. अन्वये मर्ग दाखल करुन तपासात घेतला. तदनंतर सदर मृतक हिचेचर दिनांक 03/06/2023 रोजी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे सकाळी वैद्यकीय अधिकारी यांचेकडुन पि.एम. करून घेण्यात आले व सदर प्रेत हे तीचे नातेवाईकांचे ताब्यात ताबा पावती लिहून प्रेत अंत्यविधी करीता देण्यात आले.


सदर मर्गचे चौकशी दरम्यान दिनांक 04/09/2023 रोजी मृतकचे वडील व आरोपीचे पती फिर्यादी नामे रवि आमले वय ३६ वर्ष रा. उगवा ह.मु.बलोदे से आउट हिंगणा फाटा अकोला यांनी पोस्टे खदानला लेखी रिपोर्ट दिला की 'घटनेदिवशी माझी पत्नी सौ विजया रवि आमले व मुलगी कु किशोरी रवि आमले

असे दोघीचं घरी हजर होत्या. त्यामुळे मला खात्री आहे की, माझी पत्नी सौ. विजया आमले हिने कोणत्यातरी कारणावरुन मुलीचे नाकाला प्लास्टीक चिमटा लावला व त्यामुळेच माझी मुलगी किशोरी हिचा जिव गुदमरुन तिला मारुन टाकले आहे. माझे पत्नीनेच माझ्या मुलीचा खून केला आहे, अशा सविस्तर लेखी रिपोर्ट दिला वरुन आरोपी नामे सौ विजया रवि आमले यांचे विरुध्द पोस्टे अपराध क्रमांक 505/2023 कलम 302 भादंवि प्रमाणे दाखल करून तपासात घेतला.



सदरहु प्रकरणात दि.05 /09/2023 रोजी आरोपी विजया आमले हिला पोलीसांनी अटक केली व दि. 08/09/2023 पर्यंत पोलीस कस्टडी मिळविली. त्यानंतर दि. 21/09/2023 रोजी आरोपी विजया आमले हिच्या वतीने तिचे वकिल पप्पु मोरवाल यांच्यामार्फत जामिन अर्ज दाखल केला होता. त्यावर पोलीस अधिका-यांनी आक्षेप घेतले की, सदरहु गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपी महिलेने स्वत:च्याच मुलीचा खुन केला आहे व जामिन झाल्यास ती साक्षीदार व फिर्यादीवर दबाव आणणार तसेच उर्वरीत तपास जसे सि.ए. अहवाल, दोषारोपपत्र दाखल करणे बाकी असल्यामुळे आरोपी विजया आमले हिला जामिन देण्यात येवू नये. 

त्यावर आरोपीचे वकिल ॲड. पप्पू मोरवाल यांनी युक्तीवाद केला की, फिर्यादी रवि आमले याचे व विजया आमले यांचे खूप वर्षापासून वाद होत होते व फिर्यादी व त्याच्या नातेवाईकांनी आरोपीला शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रास दिलेला आहे व पुढे त्रास देणार नाही, याबाबत चांगल्या वागणुकीचा करारनामा सुध्दा आरोपीच्या वडिलांना लिहून दिलेला आहे व दुश्मीनीपोटी फिर्यादी पतीने खोटी तक्रार आरोपी पत्नीविरूध्द दाखल केलेली आहे व त्याला भविष्यात आरोपीकडून फारकती हवी असल्यामुळे व नातेवाईकांच्या अपमनाचा बदला घेण्यासाठी आरोपी पत्नीला फसविलेले आहे. सदरहु युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश – २, यांनी आरोपी विजया आमले हिचा जामिन अर्ज मंजूर केला. यात ॲड. पप्पू मोरवाल यांना  सर्व ॲड.प्रविण तायडे,  ॲड.अक्षय दामोदर, गणेश खेडकर, ॲड. राधेशाम आवारे, ॲड. सौरभ डहाके, ॲड. कश्यप अहिर, ॲड. प्रमय भोसले, ॲड. ऋत्विक मलिए, ॲड. नंदन ठाकरे, ॲड. प्रतिक वाघ, ॲड. मिताली लखवानी, ॲड. सुनिल सरदार यांनी मदत केली. 





 

 

टिप्पण्या