court news: अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीस अटक; 27 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी

file image 




भारतीय अलंकार 24

अकोट/अकोला: अल्पवयीन मुलीस युवकाने पळवून नेत परत घरी आणून सोडले. यानंतर मात्र आरोपी युवकाने पीडित मुलीला राहत्या घरी नेवून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करुन गर्भवती केले. ही बाब मुलीच्या आईच्या लक्षात येताच आरोपी विरूद्ध पोलिसात तक्रार करण्यात आली. आरोपीला पोलीसांनी 22 ऑक्टोबर रोजी अटक करुन आज 23 ऑक्टोबर रोजी न्यायालया समोर हजर केले असता, 27 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 




या गुन्हातील फिर्यादी हिच्या मुलीला आरोपी राज रमेश मोरे (वय 20 वर्ष रा जेतवन नगर ता.अकोट जि. अकोला) याने मार्च 2023 मध्ये पळवुन नेले होते. त्यानंतर तिला घरी परत आणुन दिले. त्यावेळी बदनामी होईल म्हणुन पीडितेच्या पालकांनी पोलीस रिपोर्ट दिला नव्हता. त्यानंतर आरोपी याने पिडितेला त्याच्या राहत्या घरी जेतवन नगर येथे नेवुन तिच्यावर मार्च 2023 ते सप्टेबर 2023 पावेतो वारंवार शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केले. फिर्यादी हिच्या अशा जबानी रिपोर्ट वरून पो.स्टे. अकोट शहर येथे 22/10/23 रोजी अप.क्र. 494 / 2023 कलम 363. 354.354 (ड) 376 (2) (एन) (आय), भादंवि सह कलम 6 8 12 पोक्सो अधिनियम 2012 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला.




यानंतर आरोपी राज रमेश मोरे याची वैदयकीय तपासणी करून 22/10/2023 चे 20: 09 वाजता अटक करण्यात आली. या गुन्हाचा तपास चालू असुन पुर्ण होणे बाकी आहे. गुन्हयातील आरोपी याची गुन्हाच्या संदर्भाने वैदयकीय तपासणी करणे बाकी आहे. तसेच आरोपी याचे डि.एन.ए. प्रोफॉईल करणे असल्याने रक्त नमुणे घेणे बाकी आहे. आरोपी याने पिडिताला मार्च महिण्यात कुठे पळवुन नेले होते त्याबाबत सखोल विचारपूस करणे बाकी आहे,

या मुददयावर आरोपीची तपास कामी आवश्यकता असल्याने तो पोलीस कस्टडीत असल्याशिवाय तपास होणार नाही. त्याकरिता 27/10/2023 पर्यंत नमुद आरोपीचा PCR मंजुर होणे आवश्यक असल्याचे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायलयाच्या निदर्शनात आणून दिले.




प्रभारी (अकोट) अतीरीक्त जिल्हा व सत्र व्यायाधीश वीवेक गव्हाने अकोला यांनी आज 23 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात सरकारी वकील अजीत देशमुख यांच्या युक्तीवादानंतर आरोपी राज रमेश मोरे यास  27 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश पारीत केला आहे. या प्रकरणात तपास अधीकारी म्हणून अकोट शहर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस नीरीक्षक योगीता ठाकरे न्यायालयात उपस्थीत होत्या.


टिप्पण्या