Anti-Corruption- amrvati-akola: तीन हजाराची लाचं स्वीकारताना पोलीस हवालदार रंगेहाथ अडकला एसीबीच्या जाळ्यात



भारतीय अलंकार 24

अकोला:  जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील वाडेगाव पोलीस चौकीत  कार्यरत पोलीस हवालदार याला तीन हजाराची लाच घेताना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहात पकडले. सुभाष शालीकराम दंदी (वय - ५६ वर्ष, रा. गीतानगर, राहतनगर जवळ, दुबे एस.टी.डी. चे मागे अकोला) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 




थोडक्यात हकिकत अशी की, यातील तक्रारदार यांचेवर  पोलीस स्टेशन  बाळापूर  येथे  एन सी.  क्रमांक   727/2023 कलम 504,506 भादवी  अन्वये अदखलपात्र  गुन्हा नोंद असुन त्या अनुषंगाने  तकारदार यांचेवर कोणतीही   प्रतिबंधक कारवाई (107 crpc किवा 110 crpc) करू नये याकरीता आरोपी  सुभाष शालीकराम दंदी, वय-५६ वर्ष, व्यवसाय-नोकरी, पद-पोहवा बं.नं. ११७८, वर्ग ३, पोलीस स्टेशन बाळापूर जिल्हा अकोला अतंर्गत पोलीस चौकी वाडेगांव, रा. गीतानगर, राहतनगर जवळ,दुबे एस.टी.डी. चे मागे अकोला यांनी   तक्रारदार यांना 4000 रु ची मागणी केली व तडजोडी अंती 3000 रु लाचेची मागणी करून  तकारदार यांचेकडून  लाचेची रक्कम तिन हजार  रु. पंचासमक्ष स्विकारली वरुन  आरोपीला ताब्यात घेण्यात आले. असून त्यांचेविरुध्द पो.स्टे.बाळापुर जि.अकोला येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करण्यात आली.


मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती. देवीदास घेवारे, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती, शिवलाल भगत, पोलीस उपअधीक्षक, अमरावती घटक, अमरावती, मिलिंद कुमार  बहाकार पोलीस उपअधीक्षक, अमरावती घटक, अमरावती यांच्या मार्गदर्शनात सापळा व तपास अधिकारी पो. नि. चित्रा मेसरे ला.प्र.विभाग, अमरावती यांच्या नेतृत्वात  पो.नि.केतन मांजरे, ला.प्र.वि.अमरावती, मपोशि  चित्रा  वानखडे,  ना.पो. कॉ. निलेश महींगे, ना.पो. कॉ.संजय कोल्हे,पो. कॉ.आशिष जांभोळे,पो. उपनि बारबुध्दे, पो. कॉ. स्वप्नील क्षिरसागर यांनी ही कारवाई केली 


टिप्पण्या