court news:आपातापा चौकातील त्या घटनेतील आरोपीचा जामीन अर्ज मंजुर

 

.            ॲड. पप्पू मोरवाल 





भारतीय अलंकार 24

अकोला: पो.स्टे. सिव्हील लाईन अकोला येथे १०/७/२०२३ रोजी फिर्यादी ज्ञानेश्वर रामकृष्ण सावळे, रा. जगजिवन रामनगर अकोला यांनी तक्रार दिली होती की, ०९/०७/२०२३ रोजी रात्री १०.४५ मिनीटांनी आपातापा चौकामधुन बसस्टॅन्डकडे जात असतांना फिर्यादीचा स्कूटी गाडीवरुन तिन मुलं पाठलाग करीत होते व त्यावेळेस ते अचानक गाडीच्या समोर आले व फिर्यादीला दोघांनी गाडी खाली उतरवुन एका इसमाने त्याच्या कमरेतून चाकू काढला व फिर्यादीच्या डाव्या खाद्यांवर टोचला व फिर्यादीच्या खिश्यातील रु. ४००००/- रोख हिसकावुन त्याच्या मांडीत चाकू मारुन जखमी केले. अश्या फिर्याद वरुन पो.स्टे सिव्हील लाईन येथे भा. द. वी च्या कलम ३९४ ३४ प्रमाणे अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. 




सदरहू प्रकरणात पोलीसांनी ११/०७/२०२३ रोजी आरोपी मिहीर जय बमन याला अटक करुन  १३/०७/२०२३ पर्यंत पोलीस कस्टडी मिळवीली होती. त्यावेळेस आरोपी मिहीर बमन याच्यातर्फे ॲड. पप्पु मोरवाल यांनी नियमीत जामीन अर्ज दाखल करुन युक्तीवाद केला की, आरोपी मिहीर याला खोटे फसवुन आलेले आहे व त्याच्याकडून काही गैरकायदेशीर हत्यार जप्त करण्यात आलेले नाही. ॲड. मोरवाल यांच्या युक्तीवाद ग्राह्य धरुन विद्यमान न्यायालयाने अटी व शर्तीवर मिहीर बमन याचे जामीन अर्ज मंजुर केले. त्यावेळेस त्यांना ॲड. प्रविण तायडे, ॲड. अक्षय दामोदर व विधी विद्यार्थी गणेश खेडकर, सौरभ डाहाके, कश्यप अहिर, प्रमेय भोसले, राधेश्याम अवारे, सृष्टी ठाकरे, मिताली लखवानी, रुषीकेश संजय, रुतीक मलीये, सुनिल सरदार, अमीत लोढम इत्यादीने सहकार्य केले.

टिप्पण्या