Heavy-rains-in-Akola-Washim: अकोला, वाशिम, यवतमाळ मध्ये मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर; नागरिकांनी कामाशिवाय बाहेर जाऊ नये - प्रशासनाचे आवाहन



पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची टीम जिल्हा प्रशासना सोबत सज्ज





भारतीय अलंकार 24

अकोला: जिल्हाधिकारी निमा अरोरा  निवासी उप-जिल्हाधिकारी डाॅ.शरद जावळे यांच्या आदेशानुसार नागरिकांना यासह वाहन धारक, शेती धारक, शेतकरी, शेतमजुर, व्यवसायीक व इतर नागरिकांना माहीतीस्तव दोन दिवस झाले अकोला जिल्हयात सतत पाऊस सुरु आहे यामुळे पुरपरीस्थीती निर्माण झाली आहे ही संभाव्य धोके लक्षात घेता परीस्थिती निवळे पर्यंत याकरिता कामाशिवाय बाहेर जाऊ नये तसेच उपरोक्त काही आपात्कालीन परीस्थिती वा घटना निर्माण होत असल्यास किंवा घडल्यास तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय तथा संबंधित तहसीलदार यांच्याशी कीवा आपल्या संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, सरंपच,पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधावा. 



आपल्या सेवेसाठी व रक्षणासाठी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची टीम अंकुश  सदाफळे यांच्या नेतृत्वात रेस्क्यु बोट आणी शोध व बचाव साहीत्यासह आज दीवसभर अकोला शहरासह तालुक्यात  उपविभागीय अधिकारी डाॅ.जावळे तहसीलदार सुनिल पाटील  सह  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांच्या सोबत सज्ज आहे. 


आपत्कालीन संपर्कासाठी सर्च अँड रेस्क्यु ऑपरेशन मदतीसाठी जिवरक्षक दिपक सदाफळे पिंजर 9822229471 यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा



तीन वर्षाचा आजारी मुलीला आणले अकोल्यात 

आगर तालुका अकोला येथे तीन वर्षाची मुलगी आजारी असल्याने ती आगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती होती तीला तात्काळ पुढील उपचारासाठी अकोला येथे नेण्याचे डाॅक्टरांनी सांगीतले होते परंतु आगर येथील मोर्णानदीला मोठा पुर असल्याने मार्ग बंद होता यामुळे रात्री आठ वाजता एनडीआरएफ टीम ने दोन रेस्क्यु बोट टाकुन त्यामुलीला बोटीने अलीकडील काठावर आणले लगेचच संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या टीम ने ऑक्सिजन लाऊन अकोला येथे पथकाच्या रुगवाहीकेने पोहचुन दिले. यावेळी घटनास्थळी तहसीलदार सुनील पाटील ,सिध्दार्थ  सिरसाट राहुल कराळे गावकरी उपस्थित होते.


शिवसेना वसाहती मधील इसम सुखरूप


अकोला शहरातील शिवसेना वसाहतीतील नाल्यात वाहुन जात असलेल्या ईसमास पिंजर येथील रेस्क्यु ऑपरेशन टीमने सुखरुप वाचविले


पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांची धाडसी कामगीरी


अकोला जिल्हाधिकारी  निमा अरोरा नि.उप-जि.अ. डाॅ.शरद जावळे यांच्या आदेशानुसार, अकोला तालुक्यात सतत पाऊस सुरु आहे. यामुळे पुर परीस्थीती निर्माण झाली होती. संभाव्य धोके लक्षात घेता शनिवारी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची टीम अंकुश सदाफळे,ऋषिकेश राखोंडे, महेश साबळे, निलेश खंडारे, शेखर केवट, किशोर तायडे,विकास सदांशिव, हे रेस्क्यु बोट आणी शोध व बचाव साहीत्यासह  दीवसभर अकोला शहरासह तालुक्यात सज्ज होते. दुपारी अकोला नविन कीराणा मार्केट मध्ये पाणी घुसलेले होते. या करिता रेस्क्यु टीम अकोला तहसीलदार सुनील पाटील यांच्या  सोबत सज्ज होती याच वेळी बाजुला शिवसेना वसाहतीत आलेल्या नाल्याच्या पुरात एक जण वाहून जात असतांना येथील नागरिकांनी पाहीले आणी आरडाओरडा केली तेव्हा बाजुलाच कीराणा मार्केट मध्ये पिंजरची रेस्क्यु टीम काम करत होती तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तहसीलदार सुनील पाटील यांनी टीमला नाल्या कडे पाठविले तेव्हा क्षणाचाही विलंब न करता स्विमर अंकुश सदाफळे, किशोर तायडे,शेखर केवट,विकास सदांशिव यांनी उड्या घेतल्या आणी त्या वाहत जात असलेल्या ईसमाला धरले आणी सुखरूप बाहेर काढले यावेळी हे ईसम शिवसेना वसाहतीतील रहिवासी संतोष बांगर वय अंदाजे (60) वर्ष . असल्याची माहिती झाली उपस्थित नागरिकांनी आपात्कालीन पथकाचे कौतुक केले.


नदीनाल्यांना पूर; काही रस्ते बंद


जिल्ह्यात शनिवारी  सरासरी 37.9 मिमी पाऊस झाला. नदीनाल्यांना पूर आल्याने काही रस्ते बंद झाले आहेत. 



जिल्हा प्रशासनाकडून मदतकार्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व सर्व पथके सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे, आवश्यकता पडल्यास अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध असावे म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडेही (एनडीआरएफ) पथकाची मागणी केली. 


जिल्ह्यात सहा महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. शनिवार 22 July सायंकाळ पर्यंत तेल्हारा तालुक्यातील तेल्हारा (130.3 मिमी), माळेगाव (144.3 मि. मी.), अडगाव (176.5 मिमी), पंचगव्हाण (130.3 मिमी), हिवरखेड (149.3), तसेच अकोट तालुक्यातील उमरा महसूल मंडळातही (70.50 मिमी) अतिवृष्टी झाली.


तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील नदीला पूर येऊन अंकित ठाकूर (वय 28) हा युवक वाहून गेला. त्याबाबत शोधकार्य सुरू आहे. मोर्णा नदीला पूर आला असून आगर ते उगवा रस्ता बंद आहे. नाल्याला पूर आल्याने अकोट-वणी वारुळा-मुंडगाव रस्ता बंद आहे. तेल्हारा तालुक्यात अतिवृष्टी होऊन, विद्रुपा नदी व नाल्याला पूर आल्याने मनब्दा ते भांबेरी रस्ता बंद आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील ब्रम्ही खुर्द ते शेलू बाजार रस्ता नदीला पूर आल्याने बंद आहे. कमळणी नदीला पूर आल्याने कमळखेड- निंबा-धानोरा पाटेकरकडे जाणारा रस्ता बंद आहे.



जिल्ह्यात शनिवार दुपारपर्यंत प्राप्त माहितीनुसार 145 घरांचे अंशत: नुकसान झाले. रात्रीपासून पाऊस सतत सुरू आहे. पाऊस थांबताच शेती व पशुधन नुकसानीचे प्राथमिक अहवाल पूर्ण करण्यात येणार आहेत, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.  



तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी गावात विद्रुपा नदीला आलेल्या पुरामुळे पाथर्डी येथील राजू देठे व श्री. साबळे असे दोघेजण शेतात अडकले होते. जिल्हा शोध व बचाव पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढले. तेल्हारा तालुक्यातील अदमपूर येथील मुरलीधर वाघ हे नाल्याला पूर आल्याने शेतात अडकले होते. त्यांना बचाव पथकाने पूरस्थितीतून बाहेर काढले. बाळापूर शहराजवळील भिकुंड बंधा-याजवळ पूरस्थितीने अडकून पडलेल्या अब्दुल साबिर अब्दुल रसूल व गुलाम जफर शेख हसन या दोन व्यक्तींना बचाव पथकाने सुरक्षितपणे बाहेर काढले. जिल्हाधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी शरद जावळे यांच्याकडून परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. जिल्हा शोध व पथकाचे श्री. साबळे, सुनील कल्ले, हरिहर निमंकडे, कुरणखेड येथील वंदे मातरम पथक, पिंजर येथील संत गाडगेबाबा पथक यांच्यासह अनेक कर्मचारी व स्वयंसेवक मदतकार्यासाठी सुसज्ज आहेत.



पावसाची संततधार सुरू असल्याने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाचा अंदाज घेऊनच कामकाजाचे नियोजन करावे. पुलावरुन पाणी वाहत असल्यास रस्ता ओलांडू नये. पुराचे पाणी पाहण्यासाठी नदी-नाल्यांचे ठिकाणी जाण्याचे टाळावे.कोणीही मासेमारी करण्यास तलाव,धरण किंवा नदीमध्ये जाऊ नये.पुराच्या ठिकाणी सेल्फी काढू नये. असे आवाहन अकोला जिल्हा प्रशासनाने केले आहे.



आपात्कालीन परीस्थिती बाबतीत कारंजा जिल्हा वाशिम तालुक्याकरीता नागरिकांच्या तात्काळ माहीती साठी



वाशिम जिल्हाधिकारी शण्मुगराजन निवासी उप-जिल्हाधिकारी कैलास देवरे  यांच्या आदेशानुसार, कारंजा तालुक्यातील नागरिकांना यासह वाहन धारक, शेती धारक, शेतकरी, शेतमजुर, व्यवसायीक व इतर नागरिकांना माहीतीस्तव दोन दिवस झाले कारंजा तालुक्यात सतत पाऊस सुरु आहे यामुळे पुरपरीस्थीती निर्माण झाली आहे ही संभाव्य धोके लक्षात घेता  परीस्थिती निवळे पर्यंत याकरिता कामाशिवाय बाहेर जाऊ नये तसेच उपरोक्त काही आपात्कालीन परीस्थिती वा घटना निर्माण होत असल्यास किंवा घडल्यास तात्काळ तहसीलदार कारंजा यांच्याशी कीवा आपल्या संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, सरंपच,पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधावा. 


आपल्या सेवेसाठी व रक्षणासाठी 

पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची टीम जिवरक्षक दिपक सदाफळे यांच्या नेतृत्वात रेस्क्यु बोट आणी शोध व बचाव साहीत्यासह आज दीवसभर कारंजा शहरासह तालुक्यात कारंजा उपविभागीय अधिकारी ललित कुमार  व-हाडे  तहसीलदार कुणाल झाल्टे  सह वाशिम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत  यांच्या सोबत सज्ज आहे. 


आपत्कालीन संपर्कासाठी जि.आ.व्य.अ.शाहु भगत मोबाईल.नं.9049589693 

सर्च अँड रेस्क्यु ऑपरेशन मदतीसाठी जिवरक्षक दिपक सदाफळे पिंजर 9822229471 यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा


पोहरा देवी येथील परीस्थिती पुर्ण नियंत्रणात 


पोहरा देवी येथील परीस्थिती पुर्ण नियंत्रणात आली आहे. मंगरुळपीर उपविभागीय अधिकारी मुळे ,मानोरा तहसीलदार वजीरे यांच्या मार्गदर्शनात पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे आणी त्याचे सहकारी अतुल उमाळे,मयुर सळेदार, मयुर कळसकार,अपुर्व चेके, शुभम भोपळे,  अभिजीत जैसींगपुरे, अमर ठाकुर, हे शोध व बचाव कार्यात सहभागी होते यामध्ये  कारंजा तलाठी वक्टे पोहरादेवी तलाठी साळवे , आणी पोलीस कर्मचारी हजर होते.



यवतमाळ 

तिवसा ते दारव्हा रोड यवतमाळ मदतीकरिता हेल्पलाईन ०७२३२-२४०७२०, ०७२३२-२४०८४४, ०७२३२-२५५०७७ 

जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ

 




टिप्पण्या