court news: हिवरखेड परिसरात गांजाची विक्री करणा-या सराईत गुन्हेगाराचा जमानत अर्ज नामंजुर

file photo 



भारतीय अलंकार 24

अकोट: येथील जिल्हा व सत्र तसेच विशेष न्यायाधिश यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनचे फाईलवरी अपराध क्र. 120/23 कलम 8 (क), 20 (ब) NDPS कायदा मधील आरोपी शत्रुघ्न भाऊलाल चव्हाण वय 40 वर्ष रा. बोरवा, ता. तेल्हारा, जि. अकोला याचे कडून गोधरा फाटा ता. तेल्हारा येथे 15 किलो 540 ग्राम वजनाचा गांजा किंमत अंदाने 1,53,700/- वेगवेगळया कपनीचे 4 मोबाईल सेट ज्याची किंमत 22,000/- हिरो सुपर स्पेंडर मोटर सायकल क्र. MH-30 BH 0782 किंमत 50,000/- रुपये लाल रंगाची होंडा शाईन मोटर सायकल MH-12 MY 9223 किंमत अंदाजे 50,000/- नगदी 10,000/- असा एकुण 2,85,700/- रु. किंतीचा मुद्देमाल जप्त केल्याचे प्रकरणात आरोपीने दाखल केलेला जमानतचा अर्ज कोर्टाने नामंजुर केला आहे. हा आरोपी 29/03/2023 पासुन या प्रकरणात अकोला कारागृहामध्ये बंदीस्त आहे.


या प्रकरणाची थोडक्यात हकीगत अशी आहे की, 28/03/2023 रोजी हिवरखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांना गुप्त माहिती मिळाल्यावरुन गोधरा फाटा येथे ते राजपत्रीत अधीकारी पंच, फोटोग्राफर, वजन काटा, मोजणा-यासह जावुन सापळा लावला असता, आरोपी शत्रुघ्न भाऊलाल चव्हाण व त्याची महिला अरोपी साथीदार रेणुका शेषराव चव्हाण रा. गोरवा हे त्यांचे मोटर सायकलवर गांजा हा अमली पदार्थ विक्री करीता घेवून आले. या आरोपींकडून गांजा विकत घेण्याकरीता आरोपी महानंद बावीसकर व सैय्यद रेहान दोन्हीही रा. हातरुन हे तेथे आले असता, हिवरखेड पोलीसांनी पंचासह त्यांना घेराव घालून त्यांना ताब्यात घेतली व आरोपी शत्रुघ्न भाऊलाल चव्हाण यांचेकडून गांजा व इतर अरोपींकडून  मुद्देमाल जप्त करुन आरोपींविरुद्ध NDPS कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल केला. 




या प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील अजीत देशमुख यांनी न्यायालयात युक्तीवाद केला की, अर्जदार आरोपी व त्याची गुन्हयातील साथीदार आरोपी रेणुका चव्हाण यांचे ताब्यात या पुर्वी फार मोठया प्रमाणात अमली पदार्थ गांजा मिळून आल्याने त्यांचे विरुद्ध हिवरखेड पोलीस स्टेशनला या पुर्वी अपराध क्र. 3041 / 2015 कलम 8, 20, 22 NDPS कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच अर्जदार आरोपी शत्रुघ्न भाऊलाल चव्हाण याचेवर पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे अपराध क्र. 120/23 कलम 8 (क), 20 (ब) NDPS कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल आहे. अर्जदार आरोपीस जामीन मंजुर झाल्यास तो अकोला कारागृहातून बाहेर येवुन अशा प्रकारचे गुन्हे करण्याची दाट शक्यता आहे. तसेच अर्जदार आरोपी हा अंमली पदार्थ गांजा विक्री करण्याच्या सवयीचा असुन त्याचे या कृत्यामुळे पोलीस स्टेशन हिवरखेड परिसरात मोठया प्रमाणात तरुण पिढी व्यसनाधिन झालेली असुन आरोपीचे कृत्य हे समाजास घातक आहे.




अर्जदार आरोपीची पत्नी देवकी शत्रुघ्न चव्हाण रा. बोरवा हिचे विरुध्द पोलीस स्टेशन मेडचाल हैद्राबाद राज्य तेलंगाना येथे अपराध नं. 1216/2021 कलम 20 (ब) NDPS कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल असुन, तीचे विरुध्द  आयुक्त हैद्राबाद तेलंगाना यांनी जारी केलेली निगराणी बदमाशशीट या पोलीस ठाण्यात प्राप्त आहे. अर्जदार आरोपी याचे नातेवाईक, मध्यप्रदेश, तेलंगाना येथे असुन त्यांचे विरुध्द NDPS कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल आहेत. अर्जदार आरोपी हा सुध्दा परराज्यात येत जात असतो. या आरोपीला जामीन दिल्यास तो फरार होईल. या गुन्हयातील साक्षीदारांना धमकावून गुन्हयाच्या निष्पक्ष तपासावर परिणाम करण्याची दाट शक्यता आहे.  




या प्रकरणात दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर  न्यायालयाने आरोपीचा जमानत अर्ज फेटाळून लावला, व आदेशामध्ये नमुद केले की, आरोपी विरुध्द दोन NDPS च्या केसेस सुरु आहे. तसेच आरोपीची तथाकथीत पत्नी गुन्हेगारी प्रवृत्तीची अभिलेखावर दर्शविलेली आहे. तसेच अर्जदार आरोपी सराईत गुन्हेगार सवयीचा असल्याचे रेकार्डवरुन दिसुन येते. अश्या महत्वपूर्ण बाबींचा उल्लेख करून  कोर्टाने आरोपीचा जमानत अर्ज फेटाळून लावला आहे.

टिप्पण्या