court news: शिवणी येथील त्या खून प्रकरणातील आरोपी निर्दोष


ठळक मुद्दा 

ॲड.राकेश पाली यांचा यशस्वी युक्तिवाद



भारतीय अलंकार 24

अकोला: गेल्या 2021 मधील 27 ऑगस्टला ज्योती नितेश खरात या विवाहितेची संशयावरून हत्या करण्यात आली असून, ही हत्या तिचा पती नितेश खरात याने केली असल्याची फिर्याद मृतकेची आई तथा आरोपीची सासू सुमन देविदास पेढेकर वय 56 हिने दिली होती. या प्रकरणात आरोपी नितेश खरात हा निर्दोष असल्याचे विविध स्थिती आणि पुरावे तसेच  साक्षीदार आदींबाबत ॲड. राकेश आर. पाली यांचा यशस्वी युक्तिवाद ऐकल्यानंतर, संशयाचा फायदा  आरोपीला देत आरोपीला निर्दोष करण्यात आले असल्याचा  निर्णय अकोला प्रथम जिल्हा व सत्र न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती सुवर्णा केवले यांच्या न्यायालयाने दिला आहे 


एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादी नुसार 26 ऑगस्ट 2021 च्या संध्याकाळी  शिवणी स्मशानभूमी जवळ  मृतक ज्योती नितेश खरात हिला गंभीर मारहाण केली असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक मधुकर महल्ले  यांना मिळाली. त्यांनी या प्रकरणी आरोपी नितेश खरात याला अटक करून प्रकरणाचा तपास सुरू केला.  या प्रकरणात आरोपी हा कारागृहात असतानाच खटला चालविण्यात आला.  आणि ॲड. पाली यांचा यशस्वी युक्तिवाद कामी आल्याने अकोला प्रथम जिल्हा व सत्र न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती सुवर्णा केवले यांच्या न्यायालयाने निर्णय देण्यापुर्वी 7 साक्षीदार तपासले असता एक साक्षीदार फितूर झाला. तसेच त्याच्यापूर्वी दिलेल्या साक्षी आणि प्रत्यक्ष न्यायालयात दिलेल्या साक्षी मध्ये विसंगती आढळून आल्याने तसेच पोलीसांनी सादर केला असलेला पंचनामा संशय निर्माण करणारा असल्याने ह्या संशयाचा फायदा न्यायालयाने आरोपीला देत आरोपी नितेश खरात याला दोषमुक्त करण्याचा निर्णय दिला आहे. 



या खटल्यात आरोपीची बाजू ॲड.आर. आर. पाली, ॲड. नागसेन तायडे, ॲड. आनंद साबळे, ॲड. आकाश गाडगे यांनी मुद्देसूद मांडणी केली होती. त्यामुळे आरोपी दोषमुक्त झाला आहे.

टिप्पण्या