- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
apmc-election-2023-akola: मूर्तिजापुर व बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहकार पॅनेलची सत्ता कायम; तेल्हारा मध्ये शेतकरी पॅनेलची सत्ता पालट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: मूर्तिजापुर कुउबास मध्ये राष्ट्रवादीचे भैय्यासाहेब तिडके यांच्या नेतृत्वातील शेतकरी सहकार पॅनलने गढ कायम राखला. गेल्या 30 वर्षांपासून सहकार पॅनेलची सत्ता आहे.
शेतकरी सहकार पॅनल
राष्ट्रवादी काँग्रेस : 11
भाजप : 2
काँग्रेस : 3
शेतकरी परिवर्तन पॅनल
वंचित बहुजन आघाडी : 1
अन्य : 1
बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा शेतकरी सहकार पॅनलचे वर्चस्व कायम
सेवकराम ताथोड, राजेश राऊत आणि संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा ठासून विजय मिळविला.
बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समिती 2023 ची निवडणुकी मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता असलेल्या शेतकरी सहकार पॅनलला पुन्हा बहुमत मिळालं आणि पुन्हा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आणि आपल्या प्रत्येकाच्या हक्काचे उमेदवार निवडून आले याचे समाधान मिळाले.
बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडून आलेले उमेदवार
सेवकराम ताथोड, राजेश राऊत, संदिप पाटील, रमेश ठाकरे, रामभाऊ काळे, कैलास घोंगे, रामेश्वर पोहरे, ज्ञानेश्वर माळी, रवींद्र मुरुमकार, गजानन वझिरे, राजेश्वर वैराळे,अनिता भागवत माळी, रेखा संजय कराळे हे भरघोस मतांनी निवडून आले.
बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा शेतकरी सहकार पॅनलचे वर्चस्व कायम
गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता असलेल्या शेतकरी सहकार पॅनलला पुन्हा बहुमत मिळालं. याठिकाणी दोन्ही शिवसेना , भाजप, महाविकास आघाडीचा शेतकरी सहकार पॅनल होते.
शेतकरी सहकार पॅनल
उद्धव ठाकरे गट :5
शिवसेना शिंदे : 2
भाजप : 1
काँग्रेस : 2
राष्ट्रवादी काँग्रेस : 1
वंचित बहुजन आघाडी : 1
अन्य : 1
परिवर्तन पॅनल
वंचित बहुजन आघाडी : 2
गेल्या 10 वर्षांपासून तेल्हारा कुउबास मध्ये असलेली शेतकरी पॅनेलची सत्ता पालट
भाजप सोबत असलेल्या शेतकरी पॅनलचा शेतकरी सहकार पॅनलने केला पराभव. तेल्हारा कुउबास मध्ये भाजपने शेतकरी पॅनलला साथ दिली होती तर शेतकरी सहकार पॅनलने वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी सोबत युती केली होती.
शेतकरी सहकार पॅनल
वंचित बहुजन आघाडी : 3
शिवसेना उद्धव ठाकरे : 2
काँग्रेस : 2
राष्ट्रवादी काँग्रेस : 1
अन्य : 2
शेतकरी पॅनल
शेतकरी पॅनल : 5
भाजप : 3
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा