Akola court: मुलीचे अपहरण व अत्याचार प्रकरणी आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरी; तर दुसऱ्या प्रकरणातील आरोपीस चार वर्षाची शिक्षा






भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण करीत लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस न्यायलयाने दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश-1 शयना पाटील यांच्या कोर्टाने हा निकाल बुधवारी दिला. 



आरोपी मोहम्मद जाजीम उर्फ नादीम मोहम्मद हुसेन( वय 27 वर्ष, व्यवसाय मजुरी, जयरामसिंग प्लॉट, जुने शहर, अकोला, ता. जि. अकोला) यास अल्पवयीन पिडीताचे अपहरण करुन धमकी देवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी भा. द.वि. कलम 376 (2) सह कलम 3, 4 पोक्सो ॲक्ट अंतर्गत 10 वर्ष सक्त मजुरी व रूपये 5 हजार दंड शिक्षा ठोठावली व दंड न भरल्यास 15 दिवस कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.




पोलीस स्टेशन जुने शहर, अकोला येथे

26 जून 2017 रोजी आरोपी विरुध्द पिडीतेचे आईने तक्रार दिली की,

आरोपी याने फिर्यादीची अल्पवयीन मुलगी (वय 17 वर्ष) हिला लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून जबरदस्तीने पळ्वुन नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या तक्रारी वरुन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.




तत्कालिन तपास अधिकारी पोलीस उप निरिक्षक शामराव तायडे, तत्कालिन पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मनवरे व उमेश माने पाटील यांनी तपास करून आरोपी विरुष्द दोषारोपपत्र  न्यायप्रविष्ट केले.  सरकार पक्षातर्फे एकुण 13 साक्षी नोदविण्यात आल्या. आरोपी तर्फे दोन बचावाचे साक्षीदार तपासण्यातआले. साक्षी पुरावे ग्राहय धरुन न्यायालयाने आरोपीला शिक्षा दिली.अतिरिक्त सरकारी वकील राजेश आकोटकर यांनी प्रभावीपणे सरकार पक्षाची बाजु न्यायालयात मांडली. तसेच पैरवी अधिकारी ए. एस.आय. फझलु रेहमान काझी व एल एच.सी. वैशाली कुंबलवार यांनी सहकार्य केले.




चार वर्षांचा कारावास


अकोला: मुलीचा विनयभंग करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी  विश्वनाथ लक्ष्मण चव्हाण यास जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांच्या न्यायालयाने  4 वर्षांची शिक्षा व 9 हजारांचा दंड ठोठावला आहे. 




आरोपी विश्वनाथ लक्ष्मण चव्हाण (रा. सस्ती) याने एका मुलीचा विनयभंग केल्याने फिर्यादीच्या आधारे चान्नी पोलिसांनी विश्वनाथ लक्ष्मण चव्हाण याच्याविरुद्ध 22 मे 2008 रोजी भादंवि कलम 323, 353, 506 कलमान्वये गुन्हा दाखल केला.  याप्रकरणी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले.  




सुनावणीदरम्यान या प्रकरणात कलम 376 वाढविण्यात आले. याप्रकरणी  सुनावणीत सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीला दोषी ठरवून 4 वर्षे कारावास आणि 9 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे ऍड. आशिष पुंडकर यांनी काम पाहिले.






आंतरजिल्हा चंदन तस्कर टोळीतील पाचही आरोपींना जामीन मंजुर 





स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडून आंतरजिल्हा चंदन तस्कर टोळीचा पर्दाफाश करुन एकुण पाच आरोपीसह 1 लाख 50 हजार  बाजारमुल्याचा चंदनाचा साठा जप्त करण्यात आला होता. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, पाचही आरोपींना अटी व शर्ती सह जामीन मंजुर केला आहे.




न्यायधीश एस. बी. यादव यांच्या कोर्टाने 30 एप्रिल रोजी पाचही आरोपीना 15 हजारच्या जातमुचलका वर जामीन मंजूर केला आहे. आरोपीनी प्रत्येक गुरुवारी 11 ते 12 वेळेत पोलीस स्टेशनला हजेरी लावावी तसेच साक्षीदार यांचेवर दबाव आणणार नाहीत. अश्या अटी व शर्ती ठेवल्या आहेत. ॲड. बी. एम. इंगळे, ॲड. योगेश भगत यांनी कामकाज पाहिले.




28 एप्रिल रोजी पोलीस स्टेशन सिव्हील लाईन यांना मिळालेल्या माहिती नुसार अकोला येथून चोरी गेलेले चंदनाचे झाड  आरोपी नरेश राजाराम वानखडे (वय 37 वर्ष रा. ग्राम सिरोळे सेक्टर 1, नेरूल जि. ठाणे ह.मु कोळगाव ता. मालेगाव जि.वाशिम) , विकास उर्फ विक्की तात्याराव खडसे (वय 22 वर्ष रा. कृषी नगर, अकोला), तात्याराव सदाशिव खडसे (वय 65 वर्ष रा. कृषी नगर, अकोला),  सुशांत उर्फ बबलु दादाराव खडसे (वय 22 वर्ष रा. उमरा लहाण ता. जि. वाशिम), रितेश उर्फ बाब्या मधूकर थोरात (वय 32 वर्ष रा. कृषी नगर अकोला) यांनी चोरी केल्याचे माहीती मिळाल्याने आरोपीना ताब्यात घेवून विचापूस केली होती.  




आरोपींनी अकोला येथील वन्य विभागाचे अधिकारी यांच्या निवासस्थानातील एक चंदनाचे झाड, आकाशवाणी केंद्र अकोला परिसरातील एक चंदनाचे झाड तसेच अमरावती शहर आयुक्तालय अमरावती परिसरातील पोलीस अधिक्षक निवासस्थान अमरावती ग्रामीण येथील एक चंदनाचे झाड खोडापासुन कापून चोरी केल्याची कबूली दिली. 




आरोपी कडून एकुण 50 किलो चंदनाचे लाकडाचे तुकडे बाजारभाव प्रमाणे किंमत अंदाजे 1लाख 50 हजार रुपयेचे जप्त करण्यात आले. आरोपी व जप्त मुद्देमाल पोलीस स्टेशन सिव्हील  लाईन यांचे कडे सोपविण्यात आले होते. 




ही कारवाई  स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलीस निरिक्षक संतोष महल्ले, स.पो.नि महेश गावंडे, पो. उप. नि गोपाल जाधव, जी.पो.उप.नि गोपीलाल मावळे  सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ बोरकर, प्रमोद डोईफोडे, भास्कर धोत्रे, गोकुळ चव्हाण,  लिलाधर खंडारे, अन्सार अहेमद, सतिष पवार व चालक अं. शेख नफिज, अनिल राठोड  आदींचा समावेश असलेल्या पथकाने  केली होती.






टिप्पण्या