covid-test-update-akl-district: कोविड चाचणी: अकोल्यात पुन्हा कोविडचा उद्रेक ; आज 20 पॉझिटीव्ह रुग्ण, एकुण सक्रिय रुग्ण 38


File photo 



ठळक मुद्दा 

बाळापूर येथील दोन, मुर्तिजापूर येथील 11, अकोला ग्रामीण येथील तीन व अकोला महानगपालिका क्षेत्रातील चार रहिवाशी





भारतीय अलंकार 24

अकोला, दि.4:  आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 64 जणांचा अहवाल प्राप्त झाले. त्यात 20 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मार्फत कळविण्यात आले आहे.


आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 20 व खाजगी 0)20+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 20.


आरटीपीसीआर ‘20’ पॉझिटिव्ह


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 12 पुरुष व 8 महिलांचा समावेश असून हे रुग्ण याप्रमाणे : बाळापूर येथील दोन, मुर्तिजापूर येथील 11, अकोला ग्रामीण येथील तीन व अकोला महानगपालिका क्षेत्रातील चार रहिवाशी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.





सक्रिय रुग्ण 38


जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66156(50023+15142+991) आहे. पाच रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 38 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सहा रुग्ण  रुग्णालयात दाखल असून उर्वरीत 32 जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या