- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
घटनास्थळी पोलीस
भारतीय अलंकार 24
अकोला (विदर्भ): व्यसनाधीन बापाच्या सततच्या त्रासाला कंटाळून अकोल्यात एका अल्पवयीन मुलाने आपल्या जन्मदात्याची हत्या केल्याची घटना अकोल्यात मंगळवारी दुपारी घडली. सुनील शिकारी अस मृत व्यक्तीचं नाव आहे.
गीता नगर भागातील ही घटना आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील आणि त्याचा परिवार हा छत्तीसगडहून अकोल्यात झाडू तयार करून विक्री करण्यासाठी वास्तव्यात होता.काल रात्री या परिवारात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आज दुपारी सुद्धा पुन्हा वाद उठला आणि संतप्त मुलाने चाकूने वार करून पित्याला ठार मारलं.या घटनेनंतर मुलाने आंघोळ सुद्धा केली असल्याची चर्चा घटनास्थळी होती.
पोलिसांनी मारेकरी मुलाला आणि त्याच्या आईला ताब्यात घेतल असून पुढील चौकशी सुरू आहे. मुलाच्या आईची या घटनेत काय भूमिका आहे, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. जुने शहर पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा