khamgaon-court-bail-ganja-case : तब्बल २० किलो गांजा जप्ती प्रकरणात आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर; ॲड. चंद्रकांत वानखडे यांचा प्रभावी युक्तिवाद
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
खामगाव : एनडीपीएस अधिनियमांतर्गत व्यावसायिक प्रमाणातील २० किलो ५२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेल्या प्रकरणात आरोपीला खामगाव येथील विशेष एनडीपीएस न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. आरोपी असिफ खान एजाज खान (रा. शेगाव) याला ६ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष न्यायाधीश चंद्रकांत एन. बागल यांच्या न्यायालयाने हा दिलासा दिला.
नेमके प्रकरण काय?
प्राप्त माहितीनुसार, शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३२०/२०२६ अन्वये एनडीपीएस अधिनियमाच्या कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून आरोपीला अटक केली होती. यावेळी त्याच्याकडून २० किलो ५२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आल्याचे नमूद आहे.
जप्त करण्यात आलेला गांजा व्यावसायिक प्रमाणात असल्याने सरकारी पक्षाने आरोपीच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शविला होता. एनडीपीएस कायद्यातील कठोर तरतुदींच्या पार्श्वभूमीवर या जामीन अर्जाकडे विशेष लक्ष लागले होते.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जामीन
दरम्यान, सुमारे २० दिवसांपासून कारागृहात असलेल्या आरोपीने फौजदारी जामीन अर्ज क्रमांक ४७०/२०२६ द्वारे नियमित जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विशेष न्यायालयाने आरोपी असिफ खान एजाज खान याचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला.
बचाव पक्षातर्फे वकिलांचा युक्तिवाद
आरोपीच्या वतीने न्यायालयात ॲड. चंद्रकांत एन. वानखडे आणि ॲड. एम. ए. परवेज अरमानी यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
त्यांना ॲड. कांचन शिंदे, ॲड. असद अहमद खान, ॲड. सुमेध डोंगरदिवे, ॲड. सुनीता गवई, ॲड. कांचन ननिर आणि ॲड. प्रवीण एस. पोहरे यांनी सहकार्य केले.
व्यावसायिक प्रमाणातील गांजा जप्तीच्या एनडीपीएस प्रकरणात खामगाव विशेष न्यायालयाने आरोपीला नियमित जामीन मंजूर केल्याने या न्यायालयीन निर्णयाची चर्चा होत आहे.
BAnews24
भारतीयअलंकारन्यूज24
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा