telhara-crime-murder-case-akl: पतीची निर्घृण हत्या करणाऱ्या पत्नीला जन्मठेपची शिक्षा; तेल्हारा मधील घटना

                                    file photo 



भारतीय अलंकार 24

अकोला: पो.स्टे. तेल्हारा येथे दाखल झालेल्या गुन्हयामध्ये आरोपी श्रीमती मंगला रमेश हा रा. सभाजी चौक, जुने शहर, तेल्हारा, जि. अकोला हिस आज दि. ०९/१२/२०२२ रोजी वि. जिल्हा व सत्र न्यायालय अकोट न्यायाधीश श्री. चकोर श्रीकृष्ण बाविस्कर यांच्या न्यायालयाने आरोपीस भा.दं.वि चे कलम ३०२ या कलमांतर्गत शिक्षापात्र गुन्हयांसाठी आरोपीस जन्मठेपेच्या कारावासाची शिक्षा व १५,०००/- रू द्रव्यदंड ठोठावला आणि द्रव्यदंड न भरल्यास ०३ वर्षांचा अधिकच्या कारावासाची शिक्षा भोगावयाची आहे. तसेच भा. दं.वि. च्या कलम २०१ या कलमांतर्गत आरोपीस पाच वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा व ३००० /- रू द्रव्यदंड ठोठावण्यात आला. आरोपीने द्रव्यदंड न भरल्यास त्याने ६ महिन्यांचा अधिकच्या कारावासाची शिक्षा भोगावयाचा आहे. द्रव्यदंड न भरल्यास असणाऱ्या वैकल्पिक कारावासाच्या शिक्षा आरोपीने स्वतंत्र स्वतंत्र म्हणजे एका गुन्हयासाठी द्रव्यदंड न भरल्यास भोगावयाच्या वैकल्पिक शिक्षेच्या समाप्तीनंतर दुसऱ्या गुन्हयासाठीचा द्रव्यदंड न भरल्याची वैकल्पिक शिक्षा, अशी एकानंतर दुसरी अशा रीतीने भोगावयाच्या आहेत.


या प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी आहे की, दिनांक १०.०३.२०१९ चे रात्री दरम्यान १.०० वा. ते १.३० वा. दरम्यान यातील आरोपी श्रीमती मंगला रमेश हागे रा. संभाजी चौक, जुने शहर, तेल्हारा हिने पती रमेश ओंकार हागे वय ५० वर्ष रा. संभाजी चौक, जुने शहर, तेल्हारा हा तीचे चारीत्र्यावर संशय घेवून तीला त्रास देत असल्याने त्याचे त्रासाला कंटाळून तो घरी एकटा झोपलेला असल्याची संधी साधून त्याच्या डोक्यावर लोखंडी मुसळाने गंभीर मार करून त्याला ठार केले व त्याच्या प्रेतावर लाकडी काठया टाकून घरामधील हिरव्या रंगाचे प्लॉस्टीकच्या शिशीतील थोडे रॉकेल टाकून माचीसच्या काडीने पेटवून दिले. घरामध्ये रक्त साइलेले असल्याने नारायण हांगे यांचे पाण्याचे हौदातून पाणी आणून घर धुऊन काढले व पतीचे अंगावर पाणी टाकून विझविले. पती मरण पावले आता पोलीस चौकशी करतील म्हणून आरोपी मंगला हिने घरातील रजिस्टर चे पान फाडून पतीने आत्महत्या केली असा देखावा करण्याकरिता तिच्या हाताने चिठठी लिहून पतीच्या प्रेताजवळ ठेवून दिली व नंतर नारायण हागे यांचे घरी आरोपीची मुलगी झोपली असल्याने तिच्या जवळ जावून झोपी गेली. अशाप्रकारे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे मर्ग क्र.७ / १९ कलम १७४ जा. फौ. चे तपासामध्ये निष्पण झाल्यावरून फिर्यादी सरकारतर्फे पो.उप.नि. सुधाकर गवारगुरू पो.स्टे. तेल्हारा यांनी दिलेल्या लेखी फिर्याद वरून पो.स्टे.ला. सदरचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आरोपींविरुध्द कलम ३०२, २०१ भा.दं.वि. अंतर्गत गुन्हा क. ७५ / १९ नुसार पोलीस स्टेशन, तेल्हारा येथे गुन्हा दाखल झाला. 



दोषारोपपत्राची न्यायालयाने दखल घेवून आरोपी मंगला रमेश हागे विरूध्द वरील प्रमाणे दोषारोपण करून न्यायालयात खटला चालविला. आरोपीविरूध्द गुन्हा सिध्द करण्याकरिता सरकारपक्षांच्या वतीने सरकारी वकील अजित वि. देशमुख यांनी एकूण १३ साक्षीदारांच्या साक्षी घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने आरोपी मंगला हिच्या एकुलता एक मुलगा व मुलगी यांची देखील साक्ष नोंदविण्यात आलेली आहे. सरकारपक्षांचा व आरोपीच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकून वि न्यायालयाने आरोपीला दोषी धरून वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. वरील प्रकरणामध्ये सरकारपक्षांच्या वतीने श्री. अजित वि. देशमुख सहाय्यक सरकारी अभियोक्ता, अकोट यांनी न्यायालयासमक्ष प्रकरणात बाजू मांडली व युक्तिवाद केला की, 'सदर प्रकरणामध्ये परिस्थितीजन्य पुराव्याच्या साकळया जुडलेल्या आहेत. त्यामुळे मनुष्य खोटा बोलू शकतो, पण परिस्थिती नाही. तसेच हस्ताक्षर तंज्ञाचा अहवाल देखील या प्रकरणात दाखल असून तो देखील या प्रकरणात महत्वाचा पुरावा असून या प्रकरणात भरपूर परिस्थितीजन्य पुरावा व कागदोपत्री पुरावा उपलब्ध असल्याने आरोपीला खून करून पुरावा नष्ट केल्याबद्दल कठोर शिक्षा देण्यात यावी. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर विद्यमान जिल्हा सत्र न्यायाधीश श्री. चकोर बाविस्कर यांनी आरोपीला वरील प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. वरील प्रकरणाचा तपास पो.उप.नि. निलेश देशमुख व पी. एस. आय. गवारगुरू यांनी केला. पोलीस हे. कॉ. रामेश्वर राउत पो.स्टे. तेल्हारा ब.नं.१८८७ यांनी पैरवी म्हणून तेल्हारा पोलीसठाणेचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्य केले.



टिप्पण्या