Four students missing from college : कॉलेज मधून बेपत्ता झालेल्या चार विद्यार्थ्यांचा लागला शोध; मुंबई मधील झोपडपट्टीत सापडले चौघेही

 file pic 



भारतीय अलंकार 24

अकोला, दि.९: एकाच शिक्षण संस्थेत शिकणारे चार विद्यार्थी एकाच दिवशी अकोल्यातून बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली होती. १ऑगस्ट रोजी चौघेही बेपत्ता झाले होते. अखेर आज नवव्या दिवशी पहाटे मुंबई येथील एका झोपडपट्टी भागात चौघेही पोलीसांना सापडले. हे विद्यार्थी मुंबई पर्यंत कसे पोहचले, याबाबात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.


सविस्तर घटना अशी की,१ ऑगस्ट रोजी  चारही विद्यार्थी बेपत्ता झाले होते. आज ९ ऑगस्ट रोजी या चारही विद्यार्थ्यांचा शोध लावण्यात अकोला पोलीसाना यश मिळाले आहे. आज पहाटे हे चौघेही मुंबई येथे सापडले.  चौघेही सध्या मुंबईतील निर्मल नगर पोलिसांच्या ताब्यात आहेत. चौघांना अकोला पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. 


अकोला येथुन निघून गेल्यानंतर चौघेही सुरुवातीला नागपूर नंतर कोलकाता आणि त्यानंतर मुंबई येथे गेले असल्याची प्राथमिक माहिती आहे. आज पहाटे मुंबईच्या खेरवाडी झोपडपट्टीमध्ये चौघेही असल्याचा सुगावा पोलिसाना लागला होता.त्यानुसार शोध घेतला असता चौघेही पोलीसांना सापडले. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम जाधव यांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे. चौघांना ताब्यात घेतल्यानंतर अकोला येथे आणले जाणार आहे. त्यानंतर त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. यानंतर बेपत्ता होण्यामागचे खरे कारण समोर येणार आहे.



नापास झाल्याने बेपत्ता! 


अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील एका महाविद्यालयातून चार विद्यार्थी एकाच दिवशी बेपत्ता झाल्याची घटना घडल्याचे उघडकीस आली होती. शिक्षणात नापास झाल्याने आलेल्या नैराश्यातून मुले बेपत्ता झाल्याचे धक्कादायक कारण पोलीस तपासात समोर आले होते . १ ऑगस्टला चौघेही घरून कॉलेजला गेले होते. मात्र ,तेव्हापासून ते घरी परतले नाही. त्यामुळे त्यांची बेपत्ता होण्याची तक्रार बाळापूर आणि सिव्हील लाईन पोलिसात देण्यात आली होती. यामधील एका तरुणीचे चार विषय बाकी राहिले होते. पुढच्या वर्षी प्रवेश घेण्यासाठी काय प्रक्रिया आहे, हे पाहण्यासाठी ही तरुणी महाविद्यालयात गेली होती. त्याच प्रमाणे इतर तिन्ही विद्यार्थ्यांपैकी एकाचे काही विषय बाकी राहिले होते. तर दोघे दुसऱ्या शाखेत होते.त्यांनी परीक्षा दिली नव्हती. हे चौघेही महाविद्यालय मधिन सोबत गेल्याचे महाविद्यालय प्रशासनाचे सांगितले होते. 


तरुणी चार विषयात नापास झाल्याने  ती नैराश्यात गेली होती,अशी माहिती पोलिस तपासात समोर आली होती. चौघांचाही तपास बाळापूर पोलिसांकडून सुरू होता.

चौघांच्या बेपत्ता होण्यामागील नापास झाल्याचे  कारण समोर येत आहे. मात्र या घटनेमागे आणखी काहीतरी वेगळे कारण असावे, अशी शक्यता महाविद्यालय संचालकांनी व्यक्त केली होती. चारही विद्यार्थी महाविद्यालयात गेली होती. निकाल ऑनलाइन असल्यामुळे ते महाविद्यालयात का आले होते, हे माहीत नाही. तीन आणि चार वाजताच्या सुमारास चौघेही महाविद्यालयातून निघून गेले असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असल्याचे महाविद्यालय संचालकांनी सांगितले. या प्रकरणाशी महविद्यालयचा काही संबंध नाही, असे संचालकांनी स्पष्ट केले होते. 


चारही विद्यार्थी स्वतःहून बेपत्ता झाले आहे की त्यांच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला आहे. याचा तपास करीत होते.  बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांचे मित्र मैत्रिणी, पालक, नातेवाईक यांच्यासह महाविद्यालय परिसरातील कर्मचारी संचालक आदींची चौकशी करून त्या दिशेने तपासाची चक्रे पोलीसांनी फिरविली आणि मुंबईचे धागे दोरे हाती लागले होते.तपास योग्य दिशेने गेल्याने आज चौघेही पोलिसांना सापडले आहेत.






टिप्पण्या