Akola crime:बनावट देशीदारू कारखान्यावर छापा:मुद्दे मालासह आरोपींना रंगेहाथ अटक, विशेष पथकाची कारवाई




भारतीय अलंकार 24

अकोला, दि.२:बनावट देशीदारु बनविणाऱ्या व बनावट देशीदारू बाळगुन विक्री करणारे  कारखान्यावर मंगळवारी विशेष पथकाचा पातूर तालुक्यातील बेलोराखुर्द गावात छापा पडला असून पोलीसांनी चार आरोपीना रंगेहाथ अटक केली आहे. 


बनावट देशी दारुचा कच्चा माल स्पिरिट, सर्जिकल स्पिरिट, अलकोहोल, फ्लेवर, खाली बोट्ल, झाकणे, सीलिंग, लेबलिंग, दोन पेकिंग मशीन आदी साहित्यसह बनावट दारुच्या आठ पेटया जप्त केल्या आहेत. खाली देशीदारू संत्रा, टैंगो पंच असा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून विशेष पथकाची पुढील कारवाई सुरु आहे.


नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 420,  34, तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियंम कलम 65 A, 65F, 108 या कलमानवाये गुन्हा नोंदविण्यात येत आहे. अमोल दाबेराव , बजरंग किसन दाबेराव, दिनेश देवलाल दाबेराव, राहुल सुभाष बरगे (सर्व रा बेलोरा खुर्द ता पातुर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींचे नावे आहेत. यामध्ये अजुन आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही कारवाई कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर,अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि विशेष पथकने केली.


टिप्पण्या