- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Zilla Parishad Panchayat Samiti elections: जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुक; जि.प. उपाध्यक्ष व पंचायत समितीचे उपसभापती पदाच्या निवडीस स्थगित
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला, दि.11:महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची व सर्व पंचायत समितीमधील उपसभापती पदाची निवडीकरीता आयोजित केलेली विशेष सभा पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार जिल्ह्यातील सात पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या उर्वरित अडीच वर्षाच्या कालावधीकरीता शनिवार16 जुलै रोजी तर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची निवड 17 जुलै रोजी आयोजित केली होती. या निवडणूका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.
********************************
हवामान अंदाजःविजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
अकोला,दि.11: भारतीय हवामान विभाग यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. 14 जुलैपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 76 ते 100 मि.मी इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या कालावधीत नदी नाला काठावरील गावांना व शहरी भागातील सखल भागातील वस्त्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी, नाले, तलाव, बंधारे येथे जलसाठा जमा होत असल्याने त्यामध्ये पोहण्यास जाऊ नये. रस्त्यावरून, पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहने नेण्याबाबत दक्षता घ्यावी. तसेच स्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा