Road Accident-Akola city- flyover: नवीन उड्डाणपुलावर पहिला गंभीर अपघात: खाली कोसळून युवकाचा मृत्यू; एक जखमी




भारतीय अलंकार 24

अकोला दि.18 : नवीन उड्डाणपूलावरुन टॉवरकडे जात असलेल्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे मोटारसायकलस्वार युवक खाली फेकल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाला. तर सोबतचा दुसरा युवक गंभीर जखमी आहे. जखमीला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले आहे. अपघाग्रस्तांना रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी वेदांत तायडे याला मृत घोषित केले.


ही घटना सोमवारी अशोक वाटिका जवळून जाणाऱ्या नवीन उड्डाणपूलावर घडली आहे. अकोला औद्योगिक वसाहत क्रमांक मधील 4 रहिवाशी वेदांत गजानन तायडे (16) आणि शिव नवरत्न शर्मा (30) मोटारसायकलने अकोल्याकडे येत होते. अटलबिहारी वाजपेयी उड्डाणपूलावरील वळणावरुन जात असताना त्यांच्या मोटारसायकलला भरधाव वेगाने येत असलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, मागे बसलेला वेदांत तायडे पुलावरुन खाली फेकल्या जावून अशोक वाटिका जवळ रस्त्यावर पडला.


एवढ्या उंचीवरुन खाली कोसळल्याने वेदांतचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या शिव नवरत्न शर्मा यांना तातडीने उपचारासाठी दाखल केले. नवीन उड्डाणपूलावरील हा पहिला अपघात असून, पुलावरून मोटारसायकलस्वार खाली फेकल्या जाणे,ही गंभीर बाब आहे. जिल्हा प्रशासन, बांधकाम विभाग आणि पोलिस प्रशासन यांनी ही बाब गांभीर्याने घेवून, तातडीने उपाययोजना आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

टिप्पण्या