MLA Randhir Savarkar inspects the flooded area:आमदार रणधीर सावरकर यांची अतिवृष्टी झालेल्या भागाचे पाहणी



भारतीय अलंकार 24

अकोला: अकोला पूर्वचे आमदार  रणधीर सावरकर यांनी प्रभाग क्रमांक 4 मध्ये हातेकर वाडी येथे अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली व नागरिकांचे समस्या जाणून घेतल्या व प्रशासनाला नागरिकांचे समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे आदेश दिले. 

आमदार  रणधीर सावरकर यांनी याप्रसंगी प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याचे सूचना दिल्या व नागरिकांच्या समस्यांना त्वरित प्रतिसाद देण्याचे आदेश निर्गमित केले


अकोला पूर्व विधानसभेतील येणारे सर्व सखल भागात प्रशासनाने विशेष करून लक्ष देण्याचे व आपत्ती नियोजन यंत्रणेला कुठल्याही परिस्थितीचे सामना करण्याचे निर्देश दिले. 

एकादशीनिमित्त आमदार रणधीर सावरकर यांनी विठ्ठल रुक्माई यांचे दर्शन घेऊन शेतकरी साकडे घालून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक ती संपन्न व्हावा व पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देश व महाराष्ट्र प्रगतिशील व्हावे अशी प्रार्थना करू अकोला महानगरपालिका व अकोला जिल्ह्यातील नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार विजयी व्हावे अशी प्रार्थना केली. जिल्हा मध्ये शांतता  नांदून व्यापारी सर्व क्षेत्रातील नागरिक सुखी संपन्न व्हावे अशी प्रार्थना ही केली.


याप्रसंगी पूर्व मंडळ अध्यक्ष एडवोकेट देवाशिष काकड, पूर्व मंडळ सरचिटणीस संदीप गावंडे,  मिलिंद राऊत, अनुराधा नवकार,पल्लवी मोरे, संदीप शेगोकार, अनिल नावकार, योगेश फुसे, दत्ता कदम, विजय मदनकार  ,सुधीर  गावंडे,  बालू  बालोडे, नरेंद्र दिंडोकार ,शंकर  कपले, अजय भारसाकळे, मुकेश सराफ, आशिष कीर्तक, प्रमोद नवरखेडे ,गोपाल खुमकर, अमोल टाकळकर ,सुभाष अत्तरकर ,शरद देवरे ,निलेश गावंडे अभिजीत कडू केशव हेडा शुभम चंदन व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने  प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पण्या