Jago Pahelwan passed away:akola: शिवसेनेच्या ढाण्या वाघाची अचानक एक्झिट; हरिभाऊ भालतिलक उर्फ जागो पहेलवान यांचे निधन




भारतीय अलंकार 24

अकोला: जागो पहेलवान नावाने ओळख असलेले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी जि. प. सदस्य हरिभाऊ भालतिलक यांचे 1 जुलै रोजी रात्री 10 वाजता निधन झाले.



"शिवसेनेच्या ढाण्या वाघाची अचानक एक्झिट माझे बाबा आम्हाला सोडून गेले । तुमच्यासारखा बाप जगात होणे नाही । निशब्द" अश्या शब्दात हरिभाऊ भालतिलक यांचा मुलगा अक्षय याने आज सकाळी सोशल मीडिया अकाउंटवरून ही दुःखद वार्ता अकोलेकराना दिली आहे. वार्ता समजताच कौलखेड परिसरासह अकोला राजकिय, शैक्षणिक,क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली.



हरिभाऊ भालतीलक यांचा आठ दिवसापूर्वी अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. तेव्हा पासून त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांची अंत्ययात्रा 2 जुलै रोजी सकाळी 10 वाजता त्यांचे राहत्या घरून जुने खेतांन नगर येथून निघणार आहे. त्यांचेवर कौलखेड येथील स्मशानभूमीत अंतसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

टिप्पण्या