A M C ward wise reservation: Akl: अकोला महापालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर; महिलांना अधिक संधी,आज आरक्षणाचे प्रारूप होईल प्रसिद्ध





भारतीय अलंकार 24 

अकोला: अकोला महापालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण मंगळवारी जाहीर झाले. या नव्या आरक्षणामूळे महिलांना मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे. आरक्षणाचे प्रारूप बुधवार १ जून रोजी प्रसिद्ध केले जाईल. त्यानंतर १ जून ते ६ जून (दुपारी तीन) या कालावधीत आरक्षणाबाबत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत.ही निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने (तीन नगरसेवकांचा एक प्रभाग) होणार आहे. 


अकोला महापालिकेत एकू़ण ९१ जागा असून एकूण ४६ जागा महिलांसाठी राखीव आहे. तर १५ जागा अनुसुचित जाती तर दोन जागा अनसुचित जमातीसाठी राखीव आहे.



दरम्यान, उच्च न्यायालयाने इतर मागास वर्गाचे आरक्षण नाकारल्याने एकूण ७४ जागांवर खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहेत. एकुण ९१ जागांमधील ४६ जागा महिला प्रवर्गाकरिता आरक्षित करतांना ८ जागा अनुसुचित जाती महिला आणि एक जागा अनुसूचित जमाती महिलासाठी जाहिर झाली. तर उर्वरित ३७ जागा सर्व साधारण प्रवर्गातील महिलांसाठी जाहिर झाल्या. दरम्यांन, महापालिकेच्या एकूण ३० प्रभागातून ९१ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. २९ प्रभागातून तीन तर एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.


अनुसुचित जातीच्या लोकसंख्येनुसार उतरत्या क्रमाने एकूण १५ प्रभागातील अनुसुचित उमेदवाराकरीता ईश्वर चिठ्ठया टाकून आरक्षण सोडत जाहिर झाले. यामध्ये सात जागा अनुसूचित जाती महिला राखीव झाले.ज्यात ३-अ, ६-अ, ९-अ, १०-अ, १२-अ, १८-अ, १९-अ, आणि २३-अ जागा आहे.तर अनुसूचित जमातीसाठी ‘२४-अ’  जागा महिला राखीव करण्यात आली आहे.





सर्वसाधारण महिलांसाठी असे आहेत आरक्षित जागा, सर्वसाधारण महिलांसाठी ३७ जागा राखीव झाल्या. ज्यामध्ये १-अ, ५-अ, ७-अ, ८-अ, ११-अ, १३-अ, १५-अ, १६-अ, १७-अ, २१-अ, २२-अ, २६-अ, २८-अ, तर ‘ब’ जागांसाठी २-ब, ३-ब, ४-ब, ६-ब, ९-ब, १०-ब, १२-ब, १४-ब, १८-ब, १९-ब, २०-ब, २३-ब, २४-ब, २५-ब, २७-ब, २९-ब, ३०-ब या ३० जागा आरक्षित झाल्या होत्या. तर उर्वरित ७ जागा ‘ज्या’ प्रभागात २ जागा अनारक्षित आहे. त्या प्रभागातून चिठ्ठया टाकून आरक्षित केल्या आहे. ज्यामध्ये १-ब, ५-ब, ८-ब, १५-ब, १७-ब, २६-ब, २८-ब हे जागा सर्व साधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहे. असे एकत्रित ३७ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे.



टिप्पण्या