Nitin Gadkari-inaugurates-flyover-in Akola : ठरल तर ! अकोला शहरातील उड्डाण पुलाचे लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते 26 ला; पंतप्रधान मोदी यांची कार्यक्रमात आभासी पद्धतीने उपस्थिति



भाजपच्या सभेत घोषणा




भारतीय अलंकार 24

अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात  केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी जागतिक विक्रम करून दळणवळणाची सेवा कमी वेळात कमी किमतीत उपलब्ध करून दिली त्यामुळे सर्व राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास मोदी सरकार व गडकरी यांच्यावर असून त्यांच्या आगमनात  अकोलाच्या विकासाला चालना मिळणार असून हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी करून जनताजनार्दनाच्या साक्षीने विकास पर्वाला गती देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले. 


स्थानिक भाजपा कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब टोपले सभागृहात आयोजित अकोला भाजपाच्या बैठकीत ते बोलत होते. 



बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल हे होते. 26 मे रोजी अकोला शहरातील भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपूल तसेच संत कवरराम उड्डाणपूल याचा लोकार्पण सोहळा होत असून, यानिमित्ताने पूर्वतयारीच्या दृष्टीने भाजपा कार्यालयात बैठकीत ते बोलत होते. 



यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नाने अकोला शहरातील  उड्डाणपूल विकास पर्व सोबत जिल्ह्यात आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या विकास कार्याला गती देण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला. 





स्थानिक क्रिकेट क्लब येथे होणारा हा भव्यदिव्य एतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अकोलेकर सज्ज असून, आपण त्यांना निमंत्रण देऊन या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन आभासी सभेच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमात तसेच विकास पुरुष नितीन गडकरी यांचा 27 मे रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या पूर्व संध्येला हा भव्यदिव्य कार्यक्रम होणार आहे. 





खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, माजी महापौर अर्चना मसने यांच्या प्रयत्नाने होणारा या एतिहासिक कार्यक्रमाचे  साक्षीदार होण्यासाठी अकोलेकर मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला. 



सभेला अकोला जिल्हा भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.



टिप्पण्या