- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
NCP youth congress celebrates April Fool's Day: 'आश्वासनांचे जुमले' केक कापून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने साजरा केला एप्रिल फूल दिवस
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला: केक कापताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदधिकारी
ॲड. नीलिमा शिंगणे- जगड
अकोला: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांचे आदेशानुसार आज 1 एप्रिल रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात पेट्रोल पंपावर मोदी सरकार विरोधात 'आश्वासनांचे जुमले' केक कापून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने एप्रिल फूल दिवस साजरा केला. "मोदीजींच्या विकासाचा जन्मदिवस म्हणजेच एप्रिल फुल दिवस!" अशा शब्दात यावेळी युवक काँग्रेस च्या पदाधिकारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी महानगर अध्यक्ष विजय देशमुख, प्रदेश संघटक मो रफीक सिद्दीकी यांचे मार्गदर्शनात 1 एप्रिलचे औचित्य साधून वाढती महागाई, बेरोजगारी, खोटे जुमले या मोदींच्या आश्वासनांचा केक कापून व पेट्रोल भरणा-या ग्राहकांना गुलाबाचे फुल देउन वाढदिवस हा गांधी चौक येथील पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी युवक कांग्रेस अकोला महानगर अकोला चे वतिने साजरा करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.
या आंदोलनात अजय मते ,बुढन गाडेकर, देवानंद ताले, कार्याध्यक्ष यश सावल, शुभम पिठलोड, मंगेश इंगले,गजानन मुरूमकर , नितिन क्षिरसागर, अविनाश इंगले ,अजय कांबले, कैलाश कराले, आकाश धवसे, बालू ढोले, वैभव घुगे, पृथ्वीराज गावंडे,अमोल ठैकल,अब्दुल नईम, अब्दुल नाझिम, इरशाद खान, युवराज आसोलकर , सुजल पसारी , लावण्या रायपूरे , अध्वर्यु शर्मा , अमेय पंत, पार्थ आड़े, सूरज चतरकर ,ऋषिकेश पंडितकर आदि सह अनेक युवक पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा