- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola-Ban-plaster-of-Paris-statues: प्लास्टर ऑफ पॅरिस द्वारा मूर्ती बनविणे व विक्री बंद बाबत पारित केलेला आदेश रद्द करावा; अकोला जिल्हा मूर्तिकार कला संस्थेची मागणी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यास आलेले अकोल्यातील मूर्तिकार
ॲड. नीलिमा शिंगणे- जगड
अकोला: श्रीगणेश व अन्य मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविण्यास प्रतिबंध करण्याचा आदेश अकोला जिल्हाधिकारी यांनी 30 मार्च रोजी पारित केलेला आहे. मात्र, मुर्तीकार यांची उपजीविका संपूर्णपणे मुर्ती बनविण्याचा व्यवसायावर अवलंबून आहेत या आदेशामुळे मूर्तिकार यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. हा आदेश जिल्हाधिकारी यांनी त्वरित रद्द करावा अथवा मागे घ्यावा,अश्या मागणीचे निवेदन बुधवारी अकोला जिल्हा मूर्तिकार कला संस्थेने एका निवेदनाद्वारे केली आहे.
पिओपी मूर्तिकला व्यवसायावर परिवाराची उपजिवीका असुन हा व्यवसाय वडिलोपार्जीत आहे. या व्यवसाया व्यतिरिक्त आम्ही इतर कोणतेही व्यवसाय करीत नसल्याचे निवेदनात मुर्तीकारानी नमूद केले आहे.निवेदन देण्याकरिता बुधवारी अकोल्यातील मूर्तिकार जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्रित आले होते.यावेळी शिष्ट मंडळाने लेखी निवेदन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या कार्यालयाकडे सोपविले. जिल्हाधिकारी अरोरा यांची भेट झाली नसल्याने मागण्या संदर्भात चर्चा होवू शकली नाही,असे उपस्थित मूर्तिकार यांनी सांगितले.
आम्ही मुर्ती बनविण्याकरीता संपुर्ण सामग्री कर्ज काढून आणलेली असून या आदेशाची अमलबजावणी झाल्यास सदरचे कर्ज परतफेड करणे आमच्या करीता अशक्य आहे. यापूर्वीच शासनाने चार फुटाची नियमावली आणल्यामुळे व त्यामध्ये सुद्धा व्यवसायावर अनेक निर्बंध लादल्यामुळे आम्ही आधीच अडचणीत आलेलो आहोत. कोरोना प्रार्दुभावामूळे मागील दोन वर्षापासुन आमची परिस्थीती अत्यंत हालाखीची असुन मागच्या वर्षी सुद्धा नियमावली व निबंधामुळे आमचा व्यवसाय पुर्णसनमध्ये गेलेला आहे. मागील दोन तिन वर्षापासुन आम्ही आमची उपजिवीका कशीबशी करत असुन, यावर्षी पी.ओ.पी. मुर्ती प्रतिबंधीत केल्यास आम्हाला आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. संपूर्ण जिल्हामध्ये जवळपास एक हजार कारखाने असुन या व्यवसायावर जवळपास अदाजे 2500 कुटुंब अवलंबुन आहेत. सदर प्रतिबंध अमलबजावणी केल्यास या परिवाराचे अतोनात नुकसान होणार आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.
श्रीगणेश उत्सवावर इतर व्यवसाय जसे की, रंग, पूजा, प्रसाद, मंडप, सजावट, ट्रान्सपोर्ट व्यवसाय व इतर सुद्धा अवलंबुन असुन त्यामधुन रोजगार निर्मीती होते व सदर आदेशामुळे इतर व्यवसायावरसुद्धा विपरीत परिणाम येणार असुने रोजगार निर्मीतीवर सुद्धा परिणाम होणार असुन या व्यवसावर अवलंबुन असलेल्या परिवारावर उपासमारीची वेळ येणार आहे,असे देखील निवेदनात म्हंटले आहे.
श्री गणेश उत्सव ऑगस्ट २०२२ मध्ये असुन गणेश मुर्ती बनविण्याचे प्रकीया नोव्हेंबर २०२१ पासुनच मूर्तिकार यांनी सुरवात केलेली आहे. 80 टक्के गणेश मुर्ती पूर्णपणे तयार झालेल्या असून विकीकरीता उपलब्ध आहेत. कोरोना कालावधी मध्ये असलेल्या नियमावली व निर्बंधामुळे 10 ते 12 फुटाच्या अनेक मुर्ती शिल्लक आहेत व त्यांची विक्री सुद्धा झालेली नाही व हे नुकसान सुद्धा झालेले आहे. अचानक पारित झालेल्या आदेशामुळे 80 टक्के तयार झालेल्या मुर्तीचे विकी न झाल्यास अतोनात नुकसान होणार असुन त्यामुळे आर्थिक संकट येणार आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.
या आदेशामुळे मूर्तिकार यांच्यावर बेरोजगारीची वेळ येणार असून संपूर्ण मुर्तीकार परिवाराचे आयुष्य उधवस्त होणार आहे. मुर्तीकारांचे अधिकार व पर्यावरण संतुलन यासंबंधी प्रकरण उच्च न्यायालय यांच्या न्यायालयात प्रलंबित असुन या मुदयाच्या सुद्धा विचार करावा. सर्व बाबीचा विचार घेउन 30 मार्च 2022 रोजी पारित केलेला पोओपी मुर्ती प्रतिबंधीत करण्याचा आदेश रद्द अथवा मागे घेण्यात यावा, अशी मागणी मूर्तिकारानी केली आहे.
संस्थेचे अध्यक्ष सचिन प्रजापती यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी दिलीप प्रजापती,राजू प्रजापती, गौरव गोहलत, प्रकाश थेटे आदींसह शेकडो मूर्तिकार उपस्थित होते.
हे सुध्दा वाचा
अकोला: प्लास्टर ऑफ पॅरीस मुर्तिच्या निर्मिती, वितरण, विक्री व खरेदीवर बंदी: जिल्हाधिकारी यांचे आदेश
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा