crime news-mahavitaran-washim: महावितरणच्या जनमित्रावर हल्ला, गुन्हा दाखल

    file photo



वाशिम/अकोला, दि. २५ :थकबाकी वीज देयकाची रक्कम वसूल करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या तंत्रज्ञास मारहाण करणाऱ्या वीज ग्राहकांच्या विरोधात वाशिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वाशिम ग्रामीण (पूर्व) शाखा कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ प्रशीक साबळे हे आपले सहकारी अर्पण साबळे यांच्या समवेत सायखेडा परिसरात थकबाकी देयकाची वसुली करीत होते.या परिसरात राहणारे वीज ग्राहक रामेश्वर राठोड यांनी देयकाची रक्कम न भरल्याने वीज पुरवठा कायम स्वरुपी खंडित केला होता.त्यांना पुन्हा एकदा थकबाकी भरण्यासाठी आवाहन केले होते पण त्यांनी रक्कम भरण्यास नकार दिला. या परिसरात राहणाऱ्या रंजू चव्हाण यांनी हा प्रकार बघितला.त्याने  प्रशिक साबळे  आणि अर्पण साबळे यांच्यावर दगडफेक करून जीवे मारण्याची धमकी दिली. दगडफेकीत प्रशिक साबळे  आणि अर्पण साबळे जखमी झाले. महावितरण कडून या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपी वीज ग्राहक रंजू चव्हाण याच्या विरोधात भादवि कलम ३५३, ३३२,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टिप्पण्या