Vidarbha cricket team: Akola: दिव्यांग नॅशनल क्रिकेट स्पर्धेकरिता अकोल्याचे पाच खेळाडू विदर्भ संघात

Five Akola players in Vidarbha squad for Divyang National Cricket Tournament




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: कोलकत्ता बंगाल येथे होणाऱ्या राष्ट्रीय त्रिकोनीय क्रिकेट स्पर्धेकरिता अकोल्याच्या पाच खेळाडूंची निवड विदर्भ संघामध्ये करण्यात आली आहे. यामध्ये अष्टपैलू इरशाद खान, अष्टपैलू अजय डोंगरे, अष्टपैलू गजानन रोकडे ,अष्टपैलू सय्यद अझीम व आक्रमक फलंदाज मोहम्मद अझहर यांचा समावेश आहे. इरशाद खान याला विदर्भ संघाचा उप कर्णधार घोषित करण्यात आले.


     


कोलकत्ता येथे 17 ते 19 डिसेंबर दरम्यान दिव्यांग त्रिकोनीय क्रिकेट स्पर्धेचा आयोजन होत आहे. यामध्ये वेस्ट बंगाल, हिमाचल प्रदेश व विदर्भचा संघ सहभागी होत आहे. या स्पर्धेत फीझीकली चेलेंज क्रिकेट असोसिएशन अकोलाचे पाच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्रर्शनीय कामगिरी करीत विदर्भ संघामध्ये आपले स्थान निश्चित केले.


   


    


टिप्पण्या