New-year- Sahitya-Sammelan: अकोल्यात नववर्ष प्रारंभी राष्ट्रसंताच्या विचारांचा जागर; आठवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन




ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती अकोला द्वारे आयोजित आठवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे आयोजन 1 जानेवारी पासून अकोल्यात करण्यात आले आहे.  दोन दिवस पार पडणाऱ्या या संमेलनामध्ये राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर होणार आहे, अशी माहिती विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर बरगट यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.




अकोल्यात गत सात वर्षापासून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती अकोला द्वारा राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असते. या वर्षी आठवे राज्यस्तरीय संमेलन जानोरकर मंगल कार्यालय येथे पार पडणार आहे. राष्ट्रसंतांच्या विचाराचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनात हे संमेलन पार पडणार आहे. तर संमेलनाचे अध्यक्षपदी ज्येष्ठ प्रचारक भाऊसाहेब थुटे हे राहणार आहेत. तर स्वागताध्यक्षपदी कृष्णा अंधारे यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून स्वातंत्र्यसेनानी स्व. शंकरराव राऊत यांच्या पत्नी शेवंताबाई राऊत या राहणार आहेत.  तर प्रमुख पाहुणे म्हणून आचार्य वेरुळकर गुरुजी प्राध्यापक जावेद पाशा, डॉ. विघे गुरुजी, राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज, महापौर अर्चनाताई मसने,निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, ज्ञानेश्वर रक्षक, अरविंद देठे,  सचिन बुरघाटे, संतोष हुशे, नवनीत लखोटिया, एड. मोतीसिंह मोहता, ललित काळपांडे, रवी मानव, अशोक ओळंबे, कपिल ढोके, धनंजय मिश्रा, प्रा. उमेश चापके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.



दरवर्षी पातूर येथील भजनसम्राट स्व.  रामभाऊजी गाडगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ग्रामगीता जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. यामध्ये कमलाबाई किरडे व बाबारावजी गेडाम यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानंतर सामुदायिक प्रार्थना पार पडणार आहे. तर साई गजानन भजन मंडळ अकोला यांचे खंजिरी भजन यानंतर पार पडणार आहे. 



या संमेलनामध्ये राष्ट्रीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी एड.अनंत खेळकर हे राहणार आहेत. सहभागी कवी किशोर बळी,नरेंद्र इंगळे, एड.दिलीप कोहाडे,गोपाल मापारी, गोपाल पोलाड, वैभव भिवरकर,प्रशांत भोंडे, प्रा. संगीता बढे,बबलू तायडे, राजेश काटोले आदींची उपस्थिती लाभणार आहे.




रविवार दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी योग प्रशिक्षणाने संमेलनाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी 8 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या परिवर्तनवादी विचारांवर आधारित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे संयोजक सचिन माहोकार, मयूर वानखडे राहणार आहेत. भारतीय स्वतंत्र चळवळ आणि राष्ट्रसंत, युवक साहित्य,समाज व राजकारण, राष्ट्रसंतांच्या साहित्यातील राष्ट्रधर्म या विषयांवर आधारित ही स्पर्धा पार पडणार आहे. यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय असे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

त्यानंतर 11:30 वाजता जागतिक महामारी मुळे तरुणांपुढील आव्हाने, उपाय योजना या विषयावर परिसंवाद पार पडणार आहे यामध्ये डॉ. सुभाष गवई, प्राचार्य अरविंद देशमुख, डॉ. राजिव बोरकर आदी वक्ते विचार मंडणार आहेत.

त्यानंतर 12.30 वाजता राष्ट्रसंतांच्या साहित्यातील कर्मवाद व आदर्श समाज घडवण्यासाठी योगदान या विषयावर डॉ.  विघे गुरुजी, गोपाल कडू, अरविंद राठोड आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.  2.30  वाजता महिला परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.  यामध्ये वर्तमान परिस्थितीत महिलामध्ये राष्ट्रसंतांचे विचार रुजविणे काळाची गरज या विषयावर गुंजन गोळे, डॉ. ममता इंगोले, कु जया मांजरे विचार व्यक्त करणार आहेत.




या संमेलनाचा समारोप दुपारी 3.30 वाजता पार पडणार आहे. यावेळी  पालकमंत्री बच्चुभाऊ कडू यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून आचार्य वेरुळकर गुरुजी, विघे गुरुजी, ह भ प गव्हाळे  महाराज, अरुणभाऊ सालोडकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. अमोल मिटकरी, आ. वसंत खंडेलवाल, अनिल गावंडे, गोपाल खंडेलवाल, संग्राम गावंडे , जयंत मसने, विनोद मापारी, विनायकराव पवार, मनोज तायडे, प्रशांत गावंडे,, हरीश अलीमचंदाणी, ऍड.महेश गणगणे, मंगेश काळे, पंकज जायले, सावळे गुरुजी, रवींद्र मुंडगावकर, ऍड. वंदन कोहडे, डॉ रामेश्वर भिसे, डॉ. विक्रांत इंगळे, डॉ गजानन काकड, विक्रम जानोरकर, प्रदीप चोरे, प्रवीण हुंडीवाले, डॉ. निलेश पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  संपूर्ण संमेलन कोरोना नियमांचे पालन करून पार पडणार आहे,अशी माहिती पत्रकार परिषदेत डॉ. रामेश्वर बरगट व स्वागतध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी दिली.




या संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रसंत सेवा समितीने केले आहे. यावेळी पत्रकार परिषदेला सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर बरगट, स्वागतध्यक्ष कृष्णा अंधारे, ऍड. संतोष भोरे, श्रीकृष्ण ठोंबरे, ज्ञानेश्वर साकरकर, गोपाल गाडगे, डॉ. राजीव बोरकर, अक्षय राऊत, सचिन माहोकार आदी पदादिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या