National Child Science Council: राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेची जिल्हास्तरीय स्पर्धा : १९ शाळांच्या ११० विद्यार्थ्यांचा सहभाग,विभाग स्तर स्पर्धा ठाणे येथे

District level competition of National Child Science Council: Participation of 110 students from 19 schools


                                   



                                    


नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिचा विकास व्हावा तसेच मुलांनी विज्ञानाच्या पद्धती वापरुन स्थानिक पातळीवर समस्यांचे निराकरण करावे या हेतुने राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेची जिल्हास्तरीय स्पर्धा बालशिवाजी शाळेत रविवारी संपन्न झाली. या स्पर्धेत प्रभात किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले असून विभिन्न गटांतून त्यांचे तीन चमू विभागीय स्तरावर पोहोचले  आहेत.  



विज्ञान प्रकल्पाची निवड विभागीय स्तरावर


या स्पर्धेत जिल्हाभरातून १९ शाळांच्या ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत उच्चस्तर गटातून प्रभात किड्स स्कूलच्या इयत्ता नववीच्या आर्या पांडे व रिद्धी देशमुख या दोन विद्यार्थींनीनी बनविलेल्या विज्ञान प्रकल्पाची निवड विभागीय स्तरावर झाली. तसेच निम्नस्तर गटातून दोन विज्ञान प्रकल्पाची निवड विभागीय स्तरावर झाली. या दोन्ही गटात प्रभात किड्स स्कूलने विभागीय स्तरावर मजल मारली आहे. पहिल्या गटात अन्वी जायभाये  (इयत्ता सहावी)  आणि स्वर्णिमा घुले ( इयत्ता पाचवी) तर दुसऱ्या गटात इयत्ता सहावीतील अर्जुन चितलांगे  आणि आयुष राऊत यांच्या विज्ञान प्रकल्पाची निवड झाली आहे. त्यांना विज्ञान शिक्षक गिरीजा कुलकर्णी, स्नेहल पाटील व मेघा टेकाडे यांचे मार्गदर्शन लाभले.




    



या स्पर्धेचे जिल्हा समन्वयक उदय वझे, परीक्षक प्रा. सुहास उदापुरकर, डॉ. रश्मी जोशी, डॉ. निशा बराडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहीले. यावेळी ब्राम्हणसभा संचालित बालशिवाजी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर आणि सौ.चोपडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.


विभाग स्तरीय स्पर्धा ठाणे येथे 

दरम्यान, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेची विभाग स्तरीय स्पर्धा ठाणे येथे ११ डिसेंबर रोजी आयोजित केली असून ही स्पर्धा लाईव स्क्रीनिंगद्वारे होणार असल्याचे जिल्हा समन्वयक उदय वझे यांनी सांगीतले.    



स्पर्धेत नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर


या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. त्यामधून तीन प्रकल्पांची निवड झाली असून त्यामध्ये प्लास्टिकचा एकल वापर टाळण्याच्या दृष्टिने सेंद्रिय तथा विघटनशील पदार्थापासून निर्मित वस्तूचा वापर, शेंगदाणाच्या टरफलांपासून भांडी निर्मिती, ज्युटला पर्याय म्हणून अंबाडीची लागवड या प्रकल्पांचा समावेश आहे.

टिप्पण्या