- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
legislative council election 2021: मतमोजणी प्रक्रियेला सुरवात: बाजोरिया की खंडेलवाल कोण जिंकणार;उत्कंठा शिगेला
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला : अकोला - बुलढाणा - वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक - 2021 विधानपरिषद करिता आज अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सरकारी धान्य गोदामात मतमोजणी प्रक्रियेला सकाळी आठ वाजता पासून सुरुवात झाली आहे.
महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना) हे चौथ्यांदा निवडणुकीत रिंगणात आहे तर भाजपचे वसंत खंडेलवाल हे पहिल्यांदाच निवडणूक लढत आहे. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि अपक्षांची मते ही निर्णायक ठरणार आहेत.
या निवडणुकीत 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.आता मतदारांनी कोणाला झुकते माप दिले आहे, याचे चित्र अवघ्या काही तासातच म्हणजे सकाळी अकरा वाजेपर्यंत स्पष्ट होणार असल्याची शक्यता आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा