Akola railway station:badnera: केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे अकोल्यात: अकोला रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी साडेपाचशे कोटी रुपयाच्या प्रस्तावित कामांना मंजुरी द्यावी- खासदार धोत्रे यांनी केली मागणी







ठळक मुद्दा


*खासदार धोत्रे यांच्या प्रकृती पाहण्यासाठी  ना.दानवे अकोल्यात




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: अकोला-खंडवा मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच राज्य शासनाने जी अडवणूक केली आहे ती दूर करण्यासाठी केंद्र सरकारने पाठपुरावा करावा. अकोल्यात रेल्वेला मिळणारा आर्थिक मोबदला पाहता अकोल्यात डिव्हिजन कार्यालय सुरू करण्यात यावा ‌. वाराणसी आयोध्या, प्रयागराज साठीच तसेच राजस्थान, मध्य प्रदेशा साठी विशेष गाड्या सुरू करण्यात आला. अकोला रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी साडेपाचशे कोटी रुपयाचा प्रस्तावित कामांना मंजुरी देण्यात यावी आपण प्रकृतीमुळे सगळ्यात सतत पाठपुरावा करू शकत नाही परंतु अकोले करांच्या विकासासाठी आपण पालक होऊन विदर्भ व मराठवाडा सह दहा राज्यांना जोडणारा मार्गातील अडथळा दूर करावा अकोल्याला गतवैभव मिळवून देण्यात मदत करावी, अशी विनंती वजा मागणी केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे अकोल्यातील खासदार व माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केली.




खासदार धोत्रे यांची प्रकृती पाहण्यासाठी ना.दानवे अकोल्यात



आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे  संजय धोत्रे यांच्या निवासस्थानी त्यांची प्रकृती पाहण्यासाठी अकोल्यात आले. विशेष म्हणजे गेल्या चार लोकसभा निवडणुकीत दोन्ही विजय झाल्यानंतर एकाच लोकसभेत बेंच मध्ये बसत होते. यावेळी नामदार धोत्रे यांनी रेल्वेच्या समस्या व साडेपाचशे कोटी रुपयांचा प्रस्ताव अकोला खंडवा मार्ग तसेच युपी कडे जाणाऱ्या प्रवाशांच्या समस्या अवगत केल्या व या संदर्भात आपण लक्ष केंद्रित करावे अशी विनंती केली. यावेळी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्याशी सुद्धा भ्रमणध्वनीवर नामदार दानवे यांनी चर्चा केली. युवा नेते अनुप धोत्रे, सुहासिनीताई धोत्रे यांनी नामदार दानवे यांचे स्वागत केले. यावेळी तेजराव थोरात, जयंत मसने, मोहन पारधी माधव मानकर प्रदीप नंदा पुरे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.



यावेळी रावसाहेब दानवे यांनी लोकसभेतील अनुभव व वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली वीस वर्षाची आपली दोस्ती या विषयावर  व संजूभाऊ धोत्रे यांच्या कार्यशैली सर्वसामान्यांना फायदेशीर कशी याबाबत अनुप धोत्रे यांच्याशी दिलखुलास चर्चा केली.



बडनेरा रेल्वे स्थानकाची पाहणी


आज रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हावरा मुंबई मेलने नागपूरहून अकोल्याला जात असताना मेल वेळेआधी एक तास बडनेराला पोहचली. रावसाहेब दानवे यांनी संपूर्ण बडनेरा स्टेशनची पाहणी केली. रेल्वे प्रवाश्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या प्रसंगी रावसाहेब दानवे यांचे स्वागत भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी केले. 



बडनेरा व अमरावतीच्या अनेक समस्या त्यांच्याजवळ कुळकर्णी यांनी मांडल्या. या सर्व मागण्या तात्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिले. 


अश्या आहेत मागण्या


1. बडनेरा स्थानकावरचे दोन एसकेलेटर ( स्वयंचलित जिना ) नेहमी बंद असतात. ते सुरू ठेवण्यात यावे. 


2. सर्वाधिक गर्दी होणाऱ्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 वर देखील एसकेलेटर लावण्यात यावे. 


3. अमरावती - बडनेरा रेल्वे मार्गावर जुनीवस्ती येथे निर्माणाधिन पुलासोबत बारीपुऱ्यातील स्मशानात जाण्यासाठी प्रशस्त भुयारी मार्ग बांधण्यात यावा.


4. हावरा - शिर्डी, पुरी - सुरत आणि नागपूर - मुंबई दुरांतो या गाड्यांना बडनेरा येथे थांबा देण्यात यावा.


5. अमरावती साठी टाकलेल्या कॉर्ड लाईन ऐवजी सर्व गाड्या बडनेरा स्थानकावर आणण्यात याव्या. 


6. बडनेरा येथे होत असलेल्या रेल्वे वॅगन फॅक्टरीच्या कामाला अधिक गती यावी, यासाठी आपण स्वतः एकदा भेट द्यावी, अशा मागण्यांची  विनंती रावसाहेबांना केली. 


या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत यासबंधीचे प्रस्ताव पाठवण्याचे व तात्काळ कारवाईचे निर्देश रावसाहेब दानवे यांनी सोबतच्या अधिकारी वर्गाला दिले,असे शिवराय कुळकर्णी (प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र) यांनी सांगितले.


टिप्पण्या