Celebration - Rani Sati Dadi - Navami Utsav- Ram temple-Akola मोठ्या राम मंदिरात राणी सती दादी नवमी उत्सव उत्साहात साजरा;101 नैवेद्य अर्पण


Celebration of Rani Sati Dadi Navami Utsav in a big Ram temple; 101 Naivedya Arpan




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: देवी राणीसती दादी यांना प्रत्येक समाजात मानणारा वर्ग असून, भक्ती श्रद्धा संस्काराचे मार्ग आराधना व चांगले कर्म केल्यामुळे मनोकामना पूर्ण होत असते. मोठ्या राम मंदिर परिसरातील प्राचीन राणी सती दादी मंदिर प्रेरणादायी व समाजातील गोरगरिबांना दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन चंदा हरीप्रसाद तिवारी यांनी केले.




स्थानिक मोठ्या राम मंदिरात नवमी उत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात राणी सती मंगल पाठ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 



101 नैवेद्य अर्पण



कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम हरीहर संस्था, नमो नारायणी, रामदेव बाबा सेवा समिती व श्री रामदेव बाबा राणी सती दादी उत्सव समितीच्या वतीने केले होते. गेल्या 80 वर्षाची परंपराने याठिकाणी  सातत्याने राणी सती दादी व रामदेव बाबाचा उत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी 101 नैवेद्य अर्पण करण्यात आले. मंगल पाठ भजन करण्यात आली. 





उत्स्फूर्त सहभाग



या उत्सवात चंदा विष्णु तिवारी, चंदा हरी प्रसाद तिवारी, मंजू झुनझूनवाल, आशा गोयंका, निर्मला पंडित, अमिषा शर्मा, अर्चना शर्मा, सुशीला तिवारी, कला ताई शाहू, चंदा शर्मा, सुनीता शर्मा, संतोष शर्मा, पुष्पा सोनी, पुष्पा शर्मा, माया अग्रवाल,  आरती शर्मा, बिंदू सुरेका, मनीषा बिरोजा, सुनीता जोशी, सुशीला अग्रवाल, नेहा अगरवाल, कांता गोयल,  विजया चावला, विजया चावडा, किरण पाटील, संगीता पाटील, सरोज यादव, पुष्पा वानखडे, रेखा नालट, कल्पना अडचुले, विकी झुनझुन वाला, प्रेम गोयल, संजय अगरवाल, विद्याधर अग्रवाल, बापू शेठ अग्रवाल, गिरीश जोशी, नारायण सोनेरीवाल, विद्या जोशी, सर्वेश अग्रवाल, नारायण सुनेरीवाल, ओम प्रकाश खत्री, विजय खत्री, अनिल मानधने, गिरीराज तिवारी, नितीन जोशी, महादेव वानरे, यश शर्मा, हेमंत शर्मा, घनश्याम शर्मा, अजय सोनी, प्रकाश भुसारी, प्रवीण ढोले,  ओम पाटील, संजय शिरसाट, धनु अढाऊ आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते.





टिप्पण्या