asha-bhosale-passed-away-: चिरतरुण आवाजाने अवघ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले काळाच्या पडद्याआड …
asha-bhosale-passed-away-: चिरतरुण आवाजाने अवघ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले काळाच्या पडद्याआड …
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
f
मुख्य सामग्रीवर वगळामूर्तिजापूर/अकोला : महसूल विभागातील मंडळ अधिकारी अनिल बेलाडकर यांचा कार अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारच्या सुमारास घडली. बेलाडकर हे मूर्तिजापूरकडे परत येत असताना राष्ट्रीय महामार्ग सहा वरील सोनोरी गावाजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे.
अनिल बेलाडकर (मंडळ अधिकारी) हे बुधवारी कर्तव्यावर असताना राष्ट्रीय महामार्गाने आपल्या कार क्रमांक एमएच ३० एझेड २३९१ ने दुपारी मूर्तिजापूरकडे परत येत होते. दरम्यान विरुद्ध दिशेने येत असालेल्या अज्ञात जड वाहनाने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.
या धडकेत बेलाडकर यांच्या छातीत मोठी दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच त्यांना स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे पाठविण्यात आले. अकोला येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
पत्रकार संघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
अनिल बेलाडकर हे पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर यांचे लहान बंधू होत. अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष शोकतअली मिरसाहेब यांच्या सह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अनिल बेलाडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा