Patur cemetery blossom flowers: पातुरची स्मशानभूमी फुलझाडानी बहरली; सौंदर्यकरणासाठी उमाळे परिवाराचा पुढाकार


Patur's cemetery blossomed with flowers;Umale family initiative for beautification






अकोला: पातूर येथील हिंदू स्मशानभूमी येथे रंगीबेरंगी कुंड्या आणि फुलझाडे लावून येथिल सौंदर्यात भर पडली आहे. अभ्युदय फाउंडेशनच्या संकल्प यज्ञाला प्रतिसाद देत पातूर मधील उमाळे परिवाराने हे सौंदर्य फुलवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.




पातुरच्या हिंदू स्मशानभूमी येथे अभ्युदय फाउंडेशन ही सेवाभावी संस्था सेवाकार्य करीत आहे. अंत्यविधी साठी येणाऱ्या नागरिकांना अनेक सुविधा अभ्युदय फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने उपलब्ध केल्या आहेत. तसेच बरीच विकास कामे प्रस्तावित आहेत.  यासाठी संस्थेने नागरिकांना आवाहन केले आहे. त्यानुसार पातूरकर या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत.  



पितृपक्षाचे औचित्य साधून पातूर येथिल प्रतिष्ठित नागरिक राजेश उमाळे यांनी त्यांच्या पत्नी स्व. माधुरीताई उमाळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मशानभूमीचे सौंदर्य फुलवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी उमाळे परिवारातर्फे 42 रंगीबेरंगी आकर्षक कुंड्या आणि फुलझाडे अभ्युदय फाउंडेशनच्या सेवाकार्याला समर्पित केले.




या लोकार्पण सोहळ्याला उमाळे परिवारातर्फे राजेश उमाळे, समीक्षा उमाळे, समृद्धी उमाळे, अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी गहिलोत, डॉ. संजयसिंह परिहार, प्रवीण नीलखन, दिलीप निमकंडे, प्रशांत बंड, शुभम पोहरे, हनुमंत कुंडेवार आदी उपस्थित होते. त्यांच्या या संकल्प यज्ञाने पातुरच्या स्मशानभूमीच्या सौंदर्यात भर पडली आहे.

टिप्पण्या