Akola news letter:शेळद फाट्याजवळ बस व ट्रक मध्ये भीषण अपघात; दोन्ही वाहनाने घेतला पेट,12 प्रवासी जखमी व इतर वृत्त वाचा...

Horrific accident in bus and truck near Shelad Fata;  Both vehicles took the abdomen, injuring 12 passengers





अकोला : राष्ट्रीय महामार्गावरील शेळद फाट्या नजीक एसटी महामंडळाची बस व ट्रकमध्ये अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात ट्रक व बसने जागेवरच पेट घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये 12 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे.जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.



राष्ट्रीय महामार्गावरील शेळद फाट्या जवळ एसटी बस आणि ट्रकमध्ये हा अपघात घडला. यावेळी बस व ट्रक अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान राखून बसमधील प्रवाश्यानी बस मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र यामध्ये 12 प्रवासी गंभीर झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले.


दरम्यान, बसने अचानक पेट घेतला क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व बाळापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दल पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.


प्राप्त माहितीनूसार, अकोला जिल्हातील बाळापूर जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शेळद फाट्याजवळ दुपारी एक वाजताच्या सुमारास बाळापूरवरुन अकोलाकडे जाणाऱ्या एस.टी बस (क्रं. MH 40 AQ 616O ) ची व अकोला वरुन बाळापुरकडे जाणाऱ्या कोळशाचा ट्रक (क्रं UP 7O GT O515) शी समोरा समोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर अचानक एसटीने आणि कोळशाने भरलेल्या ट्रकने पेट घेतला. यात ट्रक व एसटी बस जळून खाक झाले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.





डाबकी रोड रेल्वे क्रॉसिंग गेट बंद राहणार


अकोला डाबकी रोड वर रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर ३६-४ डाबकी गेट ७ व ८ ऑक्टोबरला सकाळी ८ ते दुपारी ३ वाजे पर्यंत बंद राहणार आहे या रोडनी जाणे येणे करणाऱ्या नागरिकांना व वाहन धारकाना ही सुचना करण्यात आलेली आहे.





कोरोना अलर्ट 


आज बुधवार दि. ६ ऑक्टोबर २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार, 


प्राप्त अहवाल-३३८*

पॉझिटीव्ह-शून्य*

निगेटीव्ह-३३८* 


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शून्य+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य= एकूण पॉझिटीव्ह- शून्य 


अतिरिक्त माहिती


आज  दिवसभरात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. 


 सद्यस्थिती


एकूण पॉझिटीव्ह अहवाल-४३२५६+१४४२९+१७७=५७८६२

मयत-११३७

डिस्चार्ज-५६७११

दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१४ 


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त  माहितीनुसार) 


मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!





ग्लॅंडर्स आजाराचा धोकाःअश्ववर्गीय प्राण्यांची ने-आण करण्यास मनाई


Risk of glanders disease: No movement of equestrian animals



अकोला, दि.६: अश्ववर्गीय प्राणी (घोडे, गाढव, खेचर इ.) यांना ग्लॅंडर्स हा संसर्ग आजार होण्याचा धोका वर्तविण्यात आला आहे. यासंदर्भात  भारतीय कृषी अनुसंधान परिषद अश्वअनुसंधान केंद्र हिसार, तसेच सहायक आयुक्त पशुसंवर्धन, पुणे यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे  अकोला जिल्ह्यातील अश्ववर्गीय प्राण्यांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.




ग्लॅंडर्स हा आजार अश्ववर्गीय जनावरांना होतो. त्यांच्यापासून तो मानवासही होतो. मानवासाठी हा आजार प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून  हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात अश्ववर्गीय प्राण्यांच्या वाहतुकीस निर्बंध घालण्यात आले आहेत.  जिल्ह्यात अन्य जिल्ह्यातून  येणाऱ्या तसेच जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात जाणाऱ्या अश्ववर्गीय प्राण्यांच्या वाहतुकीस निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे अश्ववर्गीय प्रजातीच्या  प्राण्यांचा बाजार, शर्यती, जत्रा, पशुप्रदर्शन, लग्न समारंभ इ. ठिकाणी ने आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.






टिप्पण्या