Akola District newsletter: विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर; मतदारांनी वोटर हेल्पलाईनचा उपयोग करावा- जिल्हाधिकारी यांचे आवाहन व इतर महत्वाच्या बातम्या






अकोला, दि.1: जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पत्रानुसार 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदारयादीचा  विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी मतदार नोंदणी, नाव दुरूस्ती, नाव वगळणे आदी सुविधा ऑनलाईन व वोटर हेल्पनलाईन ॲपव्दारे घरबसल्या करता येणार आहे.  तरी नागरिकांनी वोटर हेल्पलाईन ॲपचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.  


 पुर्व पुर्ननिरीक्षण उपक्रमामध्ये दुबार अथवा समान नोंदणी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा घरोघरी भेट देऊन तपासणी करणे, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, योग्यप्रकारे विभाग , भाग तयार करणे आदी बाबी 31 ऑक्टोंबर 2021 पर्यंत  राबविण्यात येत आहे. एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  या यादीवर दावे व हरकती दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहे. दावे व हरकती 20 डिसेंबर 2021 पूर्वी निकाली काढण्यात येणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे.  


दर्शविलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील नागरीकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे इत्यादीकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे आवश्यक फॉर्म भरुन देण्यात यावे. तसेच मतदार यादीतील दुबार, स्थलांतरित, मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाहीसुध्दा यामोहिमेत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नव व पात्र मतदार यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voter helpline app या ॲपच्या मदतीने मतदारांना आपले नाव नोंदविता येईल. या व्यक्तीरिक्त ज्या मतदारांना ऑफलाईन पद्धतीने आपले नाव नोंदवावयाचे असेल त्यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज भरुन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी निमा अरोरा यांनी केले.



जि.प., पं.स. निवडणुकः ४,५ व ६ रोजी मद्यविक्री बंद


अकोला, दि.१: जिल्ह्यात ज्या जिल्हा परिषद निवडणुक विभाग व पंचायत समिती गणात पोटनिवडणुक होत आहेत. तेथे निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी  मतदानाच्या एक दिवस आधी (दि.४), मतदानाच्या दिवशी (दि.५) व मतमोजणीच्या दिवशी (दि.६) रोजी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. या आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची सज्जता


जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची सज्जता झाली आहे. 



जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४ निवडणूक विभागांमध्ये ६८ उमेदवार तर पंचायत समितीच्या२८ गणांमध्ये ११९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 

या निवडणुकीच्या मतदानासाठी तेल्हारा तालुक्यात ७७, अकोट-८१, मुर्तिजापूर- ८३, अकोला - ८५, बाळापूर -७४,  बार्शी टाकळी – ४९, पातुर-३९ असे एकूण ४८८ मतदान केंद्र आहेत. 


ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी एकुण ४४ झोन तयार करण्यात आले आहेत. ही सर्व निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ६०७ केंद्राध्यक्ष, १८२१ मतदान अधिकारी असे एकूण २४२८ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्याचे प्रशिक्षणही पार पडले आहे. या शिवाय  पोलीस बंदोबस्तही सज्ज करण्यात आला आहे.


निवडणुक आचारसंहिता अंमलबजावणी साठी जिल्ह्यात २२ पथके तैनात करण्यात आले आहेत. त्यात तेल्हारा, अकोट, मुर्तिजापूर, अकोला व बाळापूर येथे प्रत्येकी चार तर बार्शी टाकळी व पातुर येथे प्रत्येकी एक पथकांचा समावेश आहे.




आरटीपीसीआर आणि रॅपिड चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह; दोन जणांना डिस्चार्ज




अकोला,दि.1: आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 372 अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले. तर दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.


त्याच प्रमाणे काल (दि.30) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57860(43254+14429+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह शुन्य


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 322719 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 319096 फेरतपासणीचे 402  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3221 नमुने होते. आजपर्यंत एकूण 322719 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 279465आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


शुन्य पॉझिटिव्ह


आज  दिवसभरात आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, याची नोंद घ्यावी.


दोन जणांना डिस्चार्ज


दरम्यान आज होम आयसोलेशन येथील दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.


 


13 जणांवर उपचार सुरु


जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57860(43254+14429+177) आहे. त्यात 1137 मृत झाले आहेत. तर 56710 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 13 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.


रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 147 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह


 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.30) दिवसभरात झालेल्या 147 चाचण्या झाल्या त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.



काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे एक, अकोला महानगरपालिका येथे 107, जिल्हा आरोग्य कर्मचारी दोन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 34, हेगडेवार लॅब येथे तीन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 147 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला.



उद्या दिनांक 02/10/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.


1)नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा नागरी 

2) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

3)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी 

4)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

5) GMC अकोला

6) IMA hall सिव्हिल लाईन चौक, अकोला 


18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covishield(*100 ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा  द्वितीय डोस) [ 200 कूपन   प्रथम डोस तथा द्वितीय डोस ]साठी

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.


1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड

2) लेडी हार्डिंग DHW


18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covexin (* 100ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [  200 कूपन  प्रथम तथा  द्वितीय डोस ] साठी

 सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.



ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील


*अकोला महानगरपालिका अकोला.




जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीकरीता प्रवेश सुरु


अकोला, दि.1: जवाहर नवोदय विद्यालय येथे शैक्षणिक सत्र 2022-23 करीता इयत्ता सहावीच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाले आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने 30 नोव्हेंबरपर्यंत करण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर.एस. चंदनशिव यांनी केले आहे.


            प्रवेशाकरीता पात्रता 


जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेत शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिकलेला असावा, विद्यार्थी-विद्यार्थीनी इयत्ता तिसरी व चौथी पूर्ण शैक्षणिक सत्र सलगपणे सरकारमान्य शाळेतून उत्तीर्ण असावा, तसेच विद्यार्थ्यांचे इयत्ता पाचवीचे पुर्ण शैक्षणिक सत्र अकोला जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेत झालेला असावे,  विद्यार्थ्यांचा जन्म दि. 1 मे 2009 ते दि. 30 एप्रिल 2013 (दोन्ही दिवस धरुन) या कालावधीत झालेला असावा.




पालकांनी शाळेच्या मुख्याधापकांच्या सही शिक्यानिशी माहिती भरलेले फार्म आधार कार्ड व पासपोर्ट फोटो घेवून ऑनलाईन प्रवेश अर्ज करावा. प्रवेशासंबंधी माहिती करीता अधिकृत संकेतस्थळ पाहावे. तसेच अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय बाभूळगांव जहॉ. अकोला येथे  ए.पी.गेडाम, मिलिंद बनसोडे, विनय नेवे, नीलिमा गावंडे यांच्याशी संपर्क साधावा.




सर्व बॅंका, वित्त संस्था मिळून राबविणार विशेष उपक्रम 


अकोला, दि.१: केंद्रीय वित्त मंत्रालयाने पत पोहोच प्रचार मोहिम (Credit Outreach Campaign) राबविण्याचे निर्देश दिले असून या मोहिमेद्वारे सर्वसामान्य नागरिकांना विविध पत योजना तसेच कर्ज योजना याबाबत माहिती देणे अपेक्षित आहे. त्यासाठी  ७ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन सर्व बॅंका व वित्तीय संस्थांनी आपापल्या संस्थेमार्फत उपलब्ध असलेल्या अर्थसहाय्य, कर्ज योजना याबाबत माहिती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले.


या संदर्भात आज सर्व बॅंकांचे अधिकारी, व्यवस्थापक यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस बॅंक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर अभिजीत चंदा, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शरद वाळके, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आलोक तेरानिया तसेच सर्व बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते.



यावेळी बॅंकांनी आपापल्या क्षेत्रातील तसेच विविध शासकीय योजना तसेच विभागांमार्फत जे अर्थसहाय्य दिले जाते त्याबाबत माहिती देणे अपेक्षित आहे. त्यात  केंद्राच्या विविध योजना, कृषी, पशुसंगोपन, दुग्ध व्यवसाय, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना सारख्या योजनांमध्ये उदयोन्मुख उद्योजक, व्यावसायिक घटकांना अर्थसहाय्य बाबत तसेच कर्ज पुरवठ्याबाबत माहिती देणे अपेक्षित आहे. त्यासाठी ७ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन भवनात संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. त्यात सर्व बॅंका व वित्तीय संस्थांनी आपापल्या योजनांची माहिती द्यावी. या आधी कर्ज घेतलेल्या यशस्वी व्यावसायिकांची यशकथा प्रत्यक्ष सांगावी, असे सांगण्यात आले.



विसर्ग अलर्ट


घुंगशी ब्यारेज-दि 01/10/21 रोजी सकाळी 6.00 वा ,सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे ब्यारेज ची सर्व व्दारे वर उचलून ठेवण्यात आली आहेत नदीपात्रात 06 गेट मधून पूराचे पाणी वाहत आहे पाण्याची पातळी 254.00 मी असुन पूर  विसर्ग 135 घमीप्रसें आहे



 *𝐊𝐚𝐭𝐞𝐩𝐮𝐫𝐧𝐚 𝐏𝐫𝐨𝐣𝐞𝐜𝐭* 

  01/10/2021 7.00 𝐚𝐦         

 *𝐋𝐞𝐯𝐞𝐥 - 347.72𝐦𝐭𝐫* 

 *𝐒𝐭𝐨𝐫𝐚𝐠𝐞 - 85.434𝐦𝐦3* 

 *𝐏𝐞𝐫𝐜𝐞𝐧𝐭𝐚𝐠𝐞  - 98.93%* 

 *𝐓𝐨𝐝𝐚𝐲'𝐬 𝐑𝐚𝐢𝐧𝐟𝐚𝐥𝐥- 00𝐦𝐦*  

 *𝐓𝐨𝐭𝐚𝐥 𝐑𝐚𝐢𝐧𝐟𝐚𝐥𝐥 - 677.00𝐦𝐦*

 *𝐑𝐚𝐝𝐢𝐚𝐥 𝐆𝐚𝐭𝐞  𝐚𝐫𝐞 𝐜𝐥𝐨𝐬𝐞𝐝* 

 *𝐃𝐢𝐜𝐡𝐚𝐫𝐠𝐞 :-- 𝐍𝐢𝐥*


Purna Barrage-2(Ner Dhamna)

Dt. 01/10/2021 @ 7.00 A.M

Level -239.00

Gate- 12 Open(All)

Discharge- 4 gate only )200.घमीप्रसे

 

 *विसर्ग अलर्ट*

*खड़कपूर्णा प्रकल्प, दे. मही*

*दि. 1-10-2021*

*वेळ: 2.00 pm Hrs.*

जलाशय पाणीपातळी= 520.25    मी.

जीवंत पाणी साठा =86.14

जीवंत साठा टक्केवारी= 92.23%


आज *दि. 1-10-2021 रोजी  2.00 pm वाजता*  खड़कपूर्णा  प्रकल्पाचे 7 द्वार 0.5 मीटरने  उघडण्यात आले आहे.

 *सद्यस्थितीत प्रकल्पाचे 7 द्वार  0.5 मीटरने चालू असून एकूण=  12729.25cusec क्यूसेक्स(360 cumec】 विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.*


धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.


*नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे*


*खड़कपूर्णा प्रकल्प, पूर नियंत्रण कक्ष*


दिनांक 01/10/21

वेळ : 5.00 PM वाजता 

मोर्णा नदी 

नदी पातळी ...269.00 M.

उंची.........  0.40 M.

विसर्ग....... 61.95 Cumecs



टिप्पण्या