- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला,दि.19: कोरोना जिल्ह्यातून लवकरच हद्दपार होणार असे वाटत असतानाच,आज एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 4 आणि एकाचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाल्याने कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही, असे दिसून येत आहे. तर सद्यस्थितीत 22 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 242 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 239 अहवाल निगेटीव्ह तर तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.18) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57877(43270+14430+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर तीन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह चार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 326607 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 322975 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3230 नमुने होते. आजपर्यंत एकूण 326607 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 283337 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
तीन पॉझिटिव्ह
आज दिवसभरात तीन जणांचाा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिला व एक पुरुषाचा समावेश असून ते तेल्हारा तालुक्यातील रहिवासी आहे. दरम्यान रॅपिड ॲन्टीजेन चाचणी अहवालात एका रुग्णाचा समावेश आहे, याची नोंद घ्यावी.
एकाचा मृत्यू
आज दिवसभरात तेल्हारा तालुक्यातील एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांना दि. 18 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
22 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57877(43270+14430+177) आहे. त्यात 1139 मृत झाले आहेत. तर 56716 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 22 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 110 चाचण्यात एक पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.17) दिवसभरात झालेल्या 110 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे 19, अकोला महानगरपालिका येथे 51, हेगडेवार लॅब येथे आठ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 32 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे एकूण 110 चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.
लसीकरण कार्यक्रम
उद्या दिनांक 20/10/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.
1)नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा नागरी
2)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी
3) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट
4) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
5) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना
6)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
7)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
8) GMC अकोला
9) IMA hall सिव्हिल लाईन चौक, अकोला
10)नागरी आरोग्य केंद्र न्यू शिवाजी नगर शिवसेना वसाहत
मनपा शाळा
11) आर के टी आयुर्वेदिक महाविद्यालय जठारपेठ
18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covishield(*100 ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [ 200 कूपन प्रथम डोस तथा द्वितीय डोस ]साठी
पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.
1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड
2) लेडी हार्डिंग DHW
3)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर
मनपा शाळा क्रमांक 22
18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covexin (* 100ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [ 200कूपन प्रथम तथा द्वितीय डोस ]साठी
सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.
ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी पासून सुरू राहील
अकोला महानगरपालिका अकोला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा