Political:BJP News:Akola district: घोषणा देऊन नाही प्रत्यक्ष काम करण्याची मानसिकता हवी- आ रणधीर सावरकर




नीलिमा शिंगणे-जगड

बोरगाव वैराळे: आता बाळापुर विधानसभा मतदार संघातील अंदुरा, देगाव व इतर  जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषदेची पोट निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून त्यामुळे या जिल्हा परिषद मतदारसंघात येणाऱ्या गावागावात विकासाच्या घोषणाचा पाऊस पडायला गेल्या काही दिवसापासून सुरूवात झाली आहे. विकासाच्या घोषणा देणाऱ्या या लोकप्रतिनिधीना दोन वर्षात किती विकासकामे केली हा प्रश्न लोकांनी विचारला पाहिजे, माणूस काय बोलतो यापेक्षा त्याचे काम बोलले पाहिजे, असे मत आ रणधीर सावरकर यांनी बोरगाव वैराळे येथे अंदुरा - निंबा जिल्हा परिषदचे भाजपा उमेदवारच्या प्रचारा दरम्यान व्यक्त केले.


पुढे आ सावरकर म्हणाले की बाळापुर विधानसभा मतदारसंघातील एकाही गावाला जोडणारा रस्ता धड नाही मागील दोन वर्षात जेव्हा पासून आघाडी सरकार सत्तेवर आले तेव्हा पासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सुरू केलेले विकासकामे वसुली साठी बंद पाडण्यात आली आहेत त्यामुळे या तिघाडी सरकारमधील लोकप्रतिनिधीची जितकी संपत्ती वाढली त्या प्रमाणात विकासकामे झाल्याचे दिसत नाही असे असूनही या सरकारमध्ये समाविष्ट असणारे लोकप्रतिनिधी विकासाची गंगा मतदार संघात अवतरणार असे मोठ-मोठे स्वप्न लोकांना आता जिल्हा परिषद निवडणुकीत दाखवीत असल्याचे मी ऐकत आहो या लोकप्रतिनिधीना मागील दोन वर्षात किती कामाची घोषणा केली किती कामाचं नारळ फोडले अन् किती कामे पूर्ण झाली याचा लेखाजोखा जनतेने मागितला पाहिजे कारण आपण निवडून देतो हे लोकप्रतिनिधी लग्न- मरणात फिरण्यासाठी नाही तर प्रत्यक्ष मतदारसंघातील गावखेडयातील जनतेला भेडसावणा-या समस्या सोडविण्यासाठी निवडून देत असतो आणि लोकांना भेडसावणा-या समस्या सोडविल्यास जनताच तुमच्या कामाचा वाहवाह करत फिरते म्हणून माणूस नाहीतर त्याचे काम बोलले पाहिजे म्हणून जनतेने देखील विकासाची तळमळ असणाऱ्या लोकांना निवडून दिले पाहिजे, असे यावेळी सावरकर म्हणाले.     




नाना पटोले बंद साठी व्यापारी यांच्यावर दबाव तंत्र वापरत आहे-विजय अग्रवाल


अकोला: काँग्रेसप्रणीत यूपीए व संघटना चा 27 ऑक्टोंबरचा बंद राज्य सरकारच्या विरोधात असल्याचा टीका भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केली आहे.



शेतकऱ्यांची वीज कपात करण्यात येत आहे. ग्रामीण भागात पाणीपुरवठा खंडित करण्यात येत आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत सरकार देत नाही. ओबीसी मराठा समाजाचा आरक्षण राज्य सरकारला टिकवता आले नाही. पेट्रोल डिझेल याला जीएसटी च्या कक्षेमध्ये आणून सर्वसामान्यांना 60 रुपये लिटर पेट्रोल डिझेल देण्यास विरोध शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचा आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तसेच वेगवेगळ्या परीक्षेच्या गलथान कारभार निर्णय बदलण्याची वारंवार पद्धत या राज्य सरकारची असून, खंडणी टक्केवारी या सरकारची ओळख असून कलावंतांना वारकऱ्यांना मदत नाही. 



गेल्या दोन वर्षात covid-19 च्या पार्श्वभूमीवर आर्थिक चक्र थांबले असताना हिंदूच्या सणवारच्या काळात बंद करून सर्वसामान्यांना त्रास देण्याचा तसेच आर्थिक चक्र थांबून अराजकता निर्माण करण्याचा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रयत्न असून, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आलेले नाना पटोले बंद साठी विविध संघटना व्यापारी यांच्यावर दबाव तंत्र वापरत आहे.


जिल्हा परिषदच्या प्रचारासाठी आले असताना त्यांनी पक्षाचे नेते एकत्र बसून भाजप पराभूत करण्याचा व सर्व सामान्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु जनता जनार्दन पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाच्या पाठीशी राहून यांचा बंद अयशस्वी करणार, असा विश्वास भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी व्यक्त केले.



महाविकास आघाडी विरोधात भाजयुमोचे निदर्शने



अकोला: विद्यार्थी आणि बेरोजगारांची फसवणूक करून महाविकास आघाडीने त्यांच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार केला आहे. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकार शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वानाच त्रास देण्याचा प्रकार करत असून ग्रामीण भागातील वीज कपात व पाणी पुरवठा खंडित करण्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाने आज जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.



आरोग्य विभागाने क आणि ड वर्गातील भरतीसाठी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला परंतु विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी परीक्षा प्रवेश पत्र प्राप्त झाले नाही.तर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना परप्रांतात सुद्धा पाठवण्याचा प्रताप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी व आरोग्य विभाग तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या नाकर्तेपणामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला.त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला अनेक विद्यार्थी प्रवासासाठी covid-19 च्या पार्श्वभूमीवर व्यवस्था नसताना व सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता कर्ज घेऊन परीक्षा केंद्रासाठी रवाना झाले.सरकारने अचानक परीक्षा रद्द केल्या त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास झाला तसेच परीक्षा घेण्यासाठी देशातील सहा राज्यांनी ज्या कंपनींना काळ्या यादीत घातले त्या कंपनीला परीक्षा घेण्याचं काम देऊन कमिशन खोर टक्केवारी सरकारने विद्यार्थ्यांच्या भावनेचा खेळण्याचा महापाप केलं,असे आरोप करीत याविरोधात आज भारतीय जनता युवा मोर्चाने जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने दिली. 



काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड झाला म्हणून प्रत्येकाच्या खात्यामध्ये ५ हजार रुपये जमा करण्यात यावी, अशी मागणी भाजयुमोने केली.  


टिप्पण्या