pitru paksha shraddh 2021: पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ पितृपक्ष: अकोला पौरोहित्य संघाची बैठक; काय आहेत मान्यता, या काळात काय करावे काय करू नये, जाणून घ्या माहिती

Time to express gratitude for ancestors Patriarchy: Meeting of Akola Priesthood Association;  Learn what are the beliefs, what to do and what not to do during this period (photo Courtesy: Dharmendra Tripathi)





ॲड.नीलिमा शिंगणे-जगड 

अकोला: पितृ पक्षात आपल्या पूर्वजांचे पूजन केले जाते. त्यांचे स्मरण करून आशीर्वाद घेतले जाते. भारतात जवळपास सर्वच प्रांतात पितृ पक्ष पाळला जातो. काही ठिकाणी या दिवसांना श्राद्ध पक्ष किंवा हाडपक पण म्हणतात. पितृ पक्ष आज मंगळवार २० सप्टेंबर पासून सुरू झाला आहे. पितृ पक्षात पूर्वजांचे ध्यान केले जाते आणि तर्पण विधी केला जातो. 



पितृ पक्षात श्राद्ध कधी करावे



अकोला शहरातील खोलेश्वर येथील श्री भोलेश्वर मंदिरात अकोला पौरोहित्य संघाची बैठक 20 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या पितृ पक्ष निमित्त संपन्न झाली.  निर्णय सिंधू पृष्ठ क्रमांक 712 ते 728.  गरुड पुराण अध्याय 13. अंत्यसंस्कार विधी. पर्व श्राद्ध प्रणाली वाराणसी. अंत्य कर्म श्रद्धा प्रकाश गीता प्रेस. आदी धार्मिक   ग्रंथ शास्त्रचा अभ्यास केल्यानंतर पितृ पक्ष (पर्व श्राद्ध) चे सर्व शास्त्रीय निर्णय योग्य दिशेने घेण्याचा प्रयत्न केला गेला.




*पितृ पक्षातील पूर्वजांची बैठक म्हणजेच पर्व श्राद्ध. मृत व्यक्तीचे एक वर्षानंतर वार्षिक श्राद्ध केले पाहिजे. तर दरवर्षी हे श्राद्ध पितृ पक्षात करावे असे शास्त्राने आदेश दिले आहेत.



*पितृ पक्षातील श्राद्ध संदर्भात अनेक गैरसमज समाजात पसरले आहेत.या प्रश्नची उकल करण्याचा प्रयत्न पुरोहित संघाच्या सदस्यांनी यावेळी केला.


 

*कोणाचे श्राद्ध प्रथम करावे, याबाबत समाजात भ्रम पसरले आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे श्राद्ध आधी लहान व्यक्तीचे नंतर केले करावे,असे म्हंटले जाते. मात्र शास्त्रानुसार ज्याची मृत होण्याची तिथी प्रथम येते त्याचे श्राद्ध प्रथम करावे.   



*ब्राह्मण अन्न न देणे ही देखील एक चुकीची प्रथा आहे. वार्षिक श्राद्ध झाल्यावर ज्यांचे पितर जुळले आहे, इतर कोणाकडेही पितृ मिलन नसेल तर श्राद्ध करण्यात काही हरकत नाही. तारखेला ब्राह्मण अन्न दिले पाहिजे.



*एकादशीचा उपवास श्राद्ध दिवशी केला जात नाही, ही सुध्दा एक खोटी प्रथा आहे.  एकादशीला श्राद्ध करणे आवश्यक आहे आणि श्राद्ध दिवशी उपवास करता येत नाही. श्राद्धातील साहित्य फक्त श्राद्धातील असेल. भारतातील कोणत्याच धर्म शास्त्रात  साबुदाण्यापासून पिंड बनवण्याची सूचना केलेली नाही. श्राद्धात खीर महत्वाची आहे आणि ही खीर फक्त तांदळाची असेल. 



*पितृ पक्षाच्या वेळी ब्राह्मणांच्या जेवणात फळे अर्पण करणे हा एक वैयक्तिक निर्णय आहे, शास्त्र नाही.




सर्वश्री पंडित राजेश सिरोलिया, प्रमोद तिवारी, हेमंत शर्मा, भैरव शर्मा, श्यामसुंदर अवस्थी आणि पंडित रवी कुमार शर्मा बैठकीला उपस्थित होते.



काय सांगितले आहे गरुड पुराणात


गरुड पुराणात  सांगितले आहे की पितृगणात देवांसमान आशीर्वाद देण्याची आणि शाप देण्याची समान क्षमता आहे. त्यांचा आनंद कुटुंबात प्रगती आणि यश आणतो आणि तर त्यांच्या नाराजीमुळे कुटुंबात काही ना काही समस्या निर्माण होते. 


पितृपक्षात श्राद्ध आणि ब्राह्मण भोज कोणत्याही पक्षामध्ये मरण पावलेल्या व्यक्तीच्या नावाने केले जाते. तर संपूर्ण पक्षात त्याच्या नावाने जल दिले जाते.



कोणत्या दिवशी श्राद्ध केले जाईल



संपूर्ण पक्षातील श्राद्धाच्या तारखा :


पौर्णिमा श्राद्ध - २० सप्टेंबर


प्रतिपदा श्राद्ध - २१ सप्टेंबर


द्वितीया श्राद्ध - २२ सप्टेंबर


तृतीया श्राद्ध - २३ सप्टेंबर


चतुर्थी श्राद्ध - २४ सप्टेंबर


पंचमी श्राद्ध - २५ सप्टेंबर


यंदा २६ सप्टेंबरला पितृ पक्षाची कोणतीच तिथी नाही



षष्ठी श्राद्ध - २७ सप्टेंबर


सप्तमी श्राद्ध - २८ सप्टेंबर


अष्टमी श्राद्ध - २९ सितंबर


नवमी श्राद्ध - ३० सप्टेंबर


दशमी श्राद्ध - १ ऑक्टोबर


एकादशी श्राद्ध - २ ऑक्टोबर


द्वादशी श्राद्ध - ३ ऑक्टोबर


त्रयोदशी श्राद्ध - ४ ऑक्टोबर


चतुर्दशी श्राद्ध - ५ ऑक्टोबर


अमावस्या श्राद्ध - ६ ऑक्टोबर


*शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे की चतुर्दशी तिथीला, केवळ अनैसर्गिक मृत्यू झालेल्या लोकांसाठीच श्राद्ध करण्याची परंपरा आहे.


*अमावास्येला सर्व पितृ श्राद्ध असेही म्हणतात. या दिवशी, अमावस्या तिथीला मरण पावलेल्या लोकांशिवाय, ज्यांच्या मृत्यूची तारीख माहिती नाही, ज्यांनी श्राद्ध पक्षात मृत्यूच्या तारखेला श्राद्ध केले नाही ते देखील श्राद्ध करू शकतात.






पितरांसाठी काय केले पाहिजे


आपल्या पूर्वजांच्या इच्छेनुसार, दान आणि परमार्थाचे कार्य केले पाहिजे. दानामध्ये गायींचे प्रथम दान केले पाहिजे. त्यानंतर तीळ, सोने, तूप, कपडे, गूळ, चांदी, पैसे, मीठ आणि फळे दान करावे. हे दान ठराव मिळाल्यानंतरच दिले पाहिजे आणि आपल्या पुजारी किंवा ब्राह्मणाला दिले पाहिजे. श्राद्ध पक्षातील तिथीनुसार हे दान करा. असे केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, अशी मान्यता आहे.



तर पूर्वज सुखी होतील


अजाणता तुमच्या कडून चूक अथवा गुन्हा घडला आहे आणि तुम्ही या अपराधामुळे बेचैन आहात, अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या गुरुंमार्फत तुमच्या पूर्वजांची क्षमा मागावी आणि त्यांच्या चित्रावर टिळक करावे. संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा लावाव आणि त्यांच्या श्राद्ध तिथीला तुमच्या कुटुंबासह गरजूंना अन्न दान करा. पूर्वजांची पूजा  करताना तुमची चूक स्वीकारा आणि क्षमा मागा. असे केल्याने तुमचे पूर्वजांचा आत्मा सुखी होईल आणि यामुळे तुमचे कल्याणही होईल.


श्राद्ध करताना घ्यायची काळजी


श्राद्ध हा पूर्वजांना भावनिक श्रद्धांजलीचा काळ आहे. त्यामुळे या दिवशी तामसिक अन्न खाऊ नका. घराच्या प्रत्येक सदस्याने दिवंगत आत्म्यासाठी दान करा आणि त्यांना फुले द्या. एका गरीब असहाय व्यक्तीला अन्न अर्पण करा आणि त्याला कपडे द्या.


शुभ कार्य नाही


यंदा पितृपक्ष २० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आहे. या दरम्यान पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी धार्मिक कार्ये आणि उपाय केले जातात. मात्र, पितृपक्षात  बारसे- नामकरण विधी, मुंडन -जावळे काढणे, मोंज, साखरपुडा, लग्न, घर खरेदी असे कोणतेच शुभ कार्य करीत नाही. साखरपुडा आणि विवाह विषयी बोलणी देखील या काळात केली जात नाही. 



यामागचे कारण काय ?


पितृ पक्षाच्या वेळी आपले पूर्वज पृथ्वीतलावर आपल्यामध्ये येत असतात, अशी मान्यता आहे. पितरांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच आत्मिक आध्यात्मिक रित्या जुळण्यासाठी हा काळ असतो. अशा काळात आपल्या सवयी, छंद आणि शुभ कार्यावर मर्यादा घालत पूर्वजांबद्दल आदर आपुलकी प्रेम आणि समर्पण भाव व्यक्त करत असतो. जेणेकरुन पूर्वजांना कळावे की, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अजूनही त्यांची उणीव भासते. आपल्याविषयी आपल्या मुलांबाळांचे प्रेम पाहून पितृ त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देऊन जातात,असे मानले जाते.




टिप्पण्या