Food and Drug:festive season: सणसुदी उत्सव काळात भेसळ व रासायनिक प्रक्रिया करून खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर थेट कारवाई-डॉ. राजेंद्र शिंगणे

Direct action against those who sell food adulterated and chemically treated during the festive season-Dr.  Rajendra Shingne





  


ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला,दि.12: सणासुदीचे दिवस आहेत अशा उत्सव काळात भेसळ व रासायनिक प्रक्रिया केलेल्या मिठाई, फरसाण, खाद्य वस्तू विक्री केल्या जातात. अशा भेसळ करणाऱ्या व्यक्तीवर प्रशासनाने दंडात्मक कार्यवाही करावी.खाद्यपदार्थाची नियमित तपासणी करुन भेसळ होत नसल्याची खात्री करावी. भेसळ करु नये याकरीता विक्रेतांची कार्यशाळा घेवून त्यांच्यात जनजागृती निर्माण करा, असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले.




शासकीय विश्रामगृह येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी ना. डॉ. शिंगणे  बोलत होते. यावेळी विधानपरिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त  सागर तेरकर, बुलडाणा येथील औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त अशोक बरडे उपस्थित होते.



डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधी देवू नये


कोरोना काळात तसेच पावसाळ्यात साथीच्या रोगाची लागण होते. अशावेळी नागरिक उपचाराकरीता डॉक्टरकडे न जाता घरीच किंवा आपल्या सोईनुसार औषधी घेतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे औषध विक्रेत्यांनी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधी देवू नये. यासंदर्भात अंमलबजावणी प्राधान्याने करावी, असे डॉ. शिंगणे यांनी सांगितले.




गुटखा विक्री: धाडसत्र राबवावे


जिल्ह्यात  गुटखा विक्री करण्याऱ्यावर तातडीने कार्यवाही करावी. याकरीता पथक निर्माण करुन जिल्हास्तरावर धाडसत्र  राबवावे,असे ना.शिंगणे यांनी सांगितले.




औषधी व ऑक्सीजन उपलब्धते बाबत आढावा


यावेळी जिल्ह्यातील औषधी व ऑक्सीजन उपलब्धते बाबत आढावा घेण्यात आला. संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेकरीता सर्तक राहून ऑक्सीजन व औषधीचा मुबलक साठा तयार ठेवावा, असेही निर्देश यावेळी ना. शिंगणे यांनी दिले.

टिप्पण्या