transferred order:sport: क्रीडा विभागात बदलीचे वारे: आसाराम जाधव यांची धुळे येथे बदली; रिक्तपदी कोण येणार अद्याप स्पष्ट नाही

   Aasaram Jadhav Akola DSO



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला:  क्रीडा विभागात सध्या बदलीचे वारे सुरू आहेत. याआधी काही अधिकारी वर्गाच्या बदली करण्यात आल्या आहेत. तर काल नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या उपसंचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी, गट-अ आणि तालुका क्रीडा अधिकारी, गट-ब यांच्या बदलीचे आदेश 20 ऑगस्ट रोजी निघाले आहे. यामध्ये अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव आणि तालुका क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांची अकोला येथून बदली झाली आहे.



यांच्या बदलीचे आदेश


उपसंचालक


सुधीर मोरे, उपसंचालक (मुख्यालय क्रीडा व युवक सेवा, पुणे यांची उपसंचालक क्रीडा व युवक सेवा लातूर विभाग येथे बदली झाली आहे.


जिल्हा क्रीडा अधिकारी


नागपूरचे अविनाश पुंड यांची चंद्रपूर येथे.

रविंद्र नाईक नाशिक यांची रायगड येथे.

आसाराम जाधव अकोला यांची धुळे येथे.

गणेश जाधव अमरावती बुलढाणा येथे बदली झाल्याचे आदेश निघाले आहेत.मात्र रिक्त जागेवर कोण येणार हे नमूद केलेले नाही.


तालुका क्रीडा अधिकारी

लता गुप्ता ठोसरे, रेनापूर, लातूर यांची किनवट, जि. नांदेड येथे बदली झाली आहे. गणेश कुलकर्णी, पातुर, अकोला यांची कारंजा वाशिम येथे.हितेंद्र खरात सोयगाव, जि. औरंगाबाद यांची खटाव वडूज सातारा येथे.  कलिमोउद्दीन फारुखी पुर्णा, जि. परभणी यांची लोहा नांदेड येथे, चंद्रकांत उप्पलवार मानोरा वाशिम यांची वणी, जि. यवतमाळ येथे. प्रशांत दोंदल लाखांदूर भंडारा यांची आर्वी वर्धा येथे.मीरा रायबान निलंगा लातूर यांची भूम, उस्मानाबाद येथे. वर्षा साळवी अंधेरी मुंबई उपनगर यांची मानगाव, रायगड येथे बदली करण्यात आली आहे. मात्र, रिक्त पदी बदलीने कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.





दरम्यान सुधीर मोरे, उपसंचालक, क्रीडा यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या उपसंचालक (मुख्यालय), क्रीडा व युवक सेवा या पदाचा अतिरीक्त कार्यभार  सुहास पाटील, उपसंचालक, शिवछत्रपती क्रीडापीठ, बालेवाडी, पुणे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात सोपविण्यात आला आहे. इतर अधिकारीच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदांचे अतिरीक्त कार्यभार सोपविण्याचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमीत करण्यात येणार आहेत.





टिप्पण्या