Shivsangram:political:Akola:शिवसंग्रामच्या अकोला, वाशिम, बुलढाणा कार्यकारिणी बरखास्त

Akola, Washim, Buldhana executive committee of Shiv Sangram party dismissed




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : शिवसंग्राम संघटनेच्या अकोला, वाशिम आणि बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त  बरखास्त करण्यात आली असल्याची माहिती शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली आहे.




शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांच्या आदेशानुसारच अकोला, वाशिम आणि बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या असून लवकरच नविन कार्यकारिणी घोषित करण्यात येतील, असेही संदीप पाटील यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे.




अनेक दिवसांपासून पक्ष मजबुती आणि वाढीसाठी शिवसंग्राम संघटनेचे प्रयत्न सुरु असून आगामी निवडणूका लक्षात घेत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याची पश्चिम विदर्भातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

टिप्पण्या