Akola: water supply: Mahan : अत्यंत महत्वाचे: जलशुद्धीकरण केंद्र महान येथे बिघाड; अकोला शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा दुरुस्तीचे काम होईपर्यंत बंद

Breakdown at water purification center Mahan;  The entire water supply of Akola city will be closed till the repair work is completed (file photo)



अकोला: जलशुद्धीकरण केंद्र महान येथे बिघाड झाल्याने अकोला शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा दुरुस्तीचे काम होईपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.



असा झाला बिघाड

गुरुवार 5 ऑगस्ट संध्याकाळी 18.50 वा. जलशुद्धीकरण केंद्र महान येथील मुख्य इनकमर पॅनल मध्ये स्पार्क झाला. मुख्य असलेली 2500 AMP Air Circuit Breaker मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने 2500 AMP Air Circuit Breaker पूर्णपणे Burnt out झाली आहे. त्यामुळे  मुख्य पॅनल पुर्णतःबंद झाले आहे. 



दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पाणी पुरवठा बंद


नेमका बिघाड दुरुस्त होईपर्यंत जलशुद्धीकरण केंद्र बंद राहील. त्यामुळे 6 ऑगस्ट रोजी होणारा अकोला शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा दुरुस्तीचे काम होईपर्यंत बंद राहील. दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले असल्याचेही मनपा प्रशासनाने सांगितले.

टिप्पण्या