Tokyo olympic 2020:ऑलिम्पिक स्पर्धेतील दुसरा दिवस भारतासाठी समिश्र: मीराबाई चानूची रौप्य पदकाची कमाई, बॉक्सिंगमध्ये अनुभवी विकास कृष्णनला पराभवाचा धक्का

                    क्रीडांगण

         ॲड.नीलिमा शिंगणे-जगड


  Team India:Mirabai:silver medal



ऑलिम्पिक स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस भारतासाठी समिश्र राहिला. मीराबाई चानूने रौप्य पदकाची कमाई करत वेटलिफ्टिंग मध्ये भारताची ताकद जगाला दाखवून दिली. 


तिरंदाजी


तिरंदाजीत दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव या जोडीला क्वार्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे तिरंदाजीतील मिश्र टीम इवेंट मधील पदकाची आशा कोमजली. मात्र, महिला गटातून दीपिका कडून आता लक्षवेधी कामगिरीची अपेक्षा आहे. 


बॉक्सिंग


बॉक्सिंगमध्ये अनुभवी विकास कृष्णनला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. 69 वजनी गटात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या विकास कृष्णनचा स्पर्धेतील प्रवास आज संपुष्टात आला. जपानच्या सेवोनरेट्स क्विंकी मेनसाह ओकाजावा याने त्याला 5-0 अशी एकतर्फी मात दिली.



टेनिस


टेनिसमध्ये सुमित नागलने दुसरी फेरी गाठली आहे. मागील 25 वर्षांत पहिल्यांदाच एखादा भारतीय टेनिसपटूने ऑलिम्पिकमध्ये एकेरी सामन्यात विजयी सलामी दिली. त्याचा पुढील सामन्यात मदवेदेवशी टक्कर होणार आहे.


टे-टे

टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा आणि सुतिर्था यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.


बॅडमिंटन


बॅडमिंटन पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि साईराज सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीने विजयी सलामी दिली. या दोघांनी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या थायलंडच्या यांग-ची जोडीला 21-16, 16-21, 27-25 असे पराभूत करतर दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.


वेटलिफ्टिंग

वेटलिफ्टर मीराबाई चानूने भारताचे खाते उघडले असून तिने रौप्य पदकाची कमाई केली. पदक तालिकेत भारताचे नाव समाविष्ट झालं आहे.



नेमबाजी


नेमबाजीमध्ये 10 मीटर पिस्टल प्रकारात सौरभ चौधरी टॉपर ठरला. दुसरीकडे युवा नेमबाज अभिषक वर्माला फायनलमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले.


हॉकी

पुरुष हॉकी संघाने अ गटातील आपल्या पहिल्या सान्यात न्यूझीलंडचा 3-2 असा धुव्वा उडवत विजयी सलामी दिली आहे.




टोकियो ऑलिंपिक 2020 मधे भारोत्तोलन प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूचे अभिनंदन केले आहे.

@Tokyo2020 ! ची यापेक्षा आनंदी सुरुवात असू शकत नाही, @mirabai_chanu च्या या धडाकेबाज कामगिरीने भारताची मान उंचावली. भारोत्तोलन प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन!  तिच्या या यशाने प्रत्येक भारतीयाला प्रेरणा मिळेल. #Cheer4India #Tokyo2020", असे  पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.


प्रशिक्षकांना  रोख पुरस्कार


मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे. मीराबाईला चानूचे प्रशिक्षक विजय शर्मा यांना भारतातील ऑलिम्पिक संघ आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) 10 लाख रुपये रोख पुरस्कार देण्यात येणार आहे.



इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांच्या पुरस्कार रक्कमची घोषणा करण्यात आली आहे.


गोल्ड मेडल (सुवर्ण पदक) मिळवणाऱ्या खेळाडूच्या प्रशिक्षकाला 12.5 लाख रुपये, सिल्वर मेडल मिळवणाऱ्या खेळाडूच्या प्रशिक्षकाला 10 लाख रूपये आणि ब्रान्झ मेडल मिळवणाऱ्या खेळाडूच्या प्रशिक्षकाला 7.5 लाख रूपये देणार आहे.



आयईओ महासचिव राजीव मेहता म्हणाले, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे. ते दिवस रात्र मेहनत घेत असतात. उत्तम खेळाडूच्या यशामध्ये प्रशिक्षकाचे मोठे योगदान असते.


गोल्ड मेडल मिळवणाऱ्या खेळाडूला 75 लाख रूपये



आयईओने घोषणा केली की, टोकियो इथं सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडूला 75 लाख रुपये, सिलव्हर मेडल मिळवणाऱ्या खेळाडूला 40 लाख आणि कांस्य पदक मिळवणाऱ्या खेळाडूला 25 लाख रुपये देण्यात येणार आहे.



मीराबाई चानूनं शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचललं तर क्लीन अँड जर्कमध्ये मीराबाई चानूनं 115 किलो वजन उचलत पदकावर शिक्कामोर्तब केलं. मीराबाई चानू हिने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात दुसरे पदक मिळवून दिले आहे. तर भारताकडून वेटलिफ्टिंग मध्ये रौप्य पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. वेटलिफ्टिंग मध्ये 49 किलो वजनगटात चीनच्या जजिहूला सुवर्णपदक मिळाले. 





टिप्पण्या