Junior National Boxing: ज्युनियर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याला 2 पदक; कंचन सुरांशे व शाश्‍वत तिवारी पदकाचे मानकरी

Akola won 2 medals at the Junior National Boxing Championships;  Kanchan Suranshe and Shashavat Tiwari medalists




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: हरियाणा मधील सोनीपत येथे 24 ते 31 जुलै या कालावधीत आयोजित ज्युनियर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रीडा प्रबोधिनी व प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी  महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत दोन पदकाची कमाई केली.



कडवी झुंज



कंचन सुरांशे हिने हरियाणाच्या खेळाडू सोबत कडवी झुंज देत रौप्यपदक पटकाविले. शाश्वत तिवारी याला कास्य पदकावर समाधान मानावे लागले. दोन्ही बॉक्सर राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहेत. 





अकोल्याला मागील दोन दशकात बॉक्सिंगचे शहर अशी ओळख मिळाली आहे. कोरोना कालावधीनंतर ही मोठी उपलब्धी अकोल्याच्या ज्युनिअर बॉक्सरांनी मिळवून, परत एकदा अकोल्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले. जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी खेळाडूंचे कौतूक केले.

टिप्पण्या