- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Health: Urologist: Akola:medical: युरोलॉजिस्ट प्रशांत मुळावकर यांनी अकोल्याच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रोस्टेट आजार उपचारा संबंधित राष्ट्रीय पातळीवरील सल्लागार समिती सदस्यपदी निमंत्रित
अकोला: युरोलॉजिस्ट डॉ प्रशांत मुळावकर यांनी अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. युरोलोजी मधील विविध आजारांवर सुसूत्रतेने व्यवस्थित उपचार व्हावेत, या उद्देशाने युरोलोजीकल सोसायटी ऑफ इंडियाने साधारणतः तीन वर्षांपूर्वी वेगवेगळ्या आजारावरील तज्ञांना त्यांच्या कौशल्य क्षेत्रातील राष्ट्रीय पातळी वरील सल्लागार समितीवर निमंत्रित केले.
यासाठी ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नवी दिल्ली येथील माजी युरोलोजी विभाग प्रमुख डॉ नर्मदा प्रसाद गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शिखर समितीची स्थापना केली गेली . या शिखर समितीने डॉ प्रशांत मुळावकर यांच्या योगदानाची दाखल घेतली व त्यांना प्रोस्टेट आजाराच्या उपचारा संबंधित राष्ट्रीय पातळी वरील सल्लागार समिती मध्ये निमंत्रित केले गेले.
या राष्ट्रीय सल्लागार समितीत फक्त तीन सदस्य आहेत. नडीयाद येथील डॉ रवींद्र सबनीस ह्या समितीचे अध्यक्ष आहेत, तर अहमदाबाद येथील डॉ रोहित जोशी आणि अकोल्यातील डॉ प्रशांत मुळावकर हे दोन सदस्य आहेत.
या समितीने प्रोस्टेट ग्रंथीच्या आजाराच्या संबंधित जगभरातील सर्व संशोधनाचा तुलानामात्क अभ्यास केला. त्या करिता जवळपास ५०० हून अधिक प्रबंधांचा सविस्तर अभ्यास केला. त्या शोध प्रबंधातील अनुमानांचा सांगोपांग विचार केला गेला. समाजातील सर्व घटकांना ह्या शिफारशींचा लाभ व्हावा या हेतूने सर्व शिफारशी करताना भारतातील उपलब्ध संशोधनाचा प्रामुख्याने विचार केला गेला. प्रगत व अप्रगत देशातील प्रोस्टेट आजाराच्या उपचारा संबंधित शिफारसींवर विचार विनिमय केला गेला व २१६ शोध निबंधातील शिफारसींचा भरतील परिस्थितीत लागू होतील असे निष्कर्ष स्वीकारले गेले.
सल्लागार समिती मधील चर्चेसाठी शोध निबंधांची निवड करणे, त्यामधील निष्कर्षांचे तौलनिक मूल्यमापन करणे व अंतिम शिफारशींचा मसुदा तयार करणे ही महत्वाची कामे डॉ प्रशांत मुळावकर यांनी केली. जवळपास दोन वर्षे हे काम चालले. व त्या आधारे विविध आजाराबद्दल औषधे व ऑपरेशन ह्यांची शिफारस केली.
कोणती लक्षणे असल्यास कोणती औषधे द्यावीत, कोणती औषधे देवू नयेत, कोणते ऑपरेशन करणे हितावह आहे याबद्दल सांगोपांग चर्चा केली. उपलब्ध निष्कर्षांचे पुनरावलोकन करून डॉ प्रशांत मुळावकर यांनी जवळपास ५० पानांचा मसुदा तयार केला. शिखर परिषदेने त्यावर चर्चा करून तो जसाचा तसा स्वीकृत केला व जुलैच्या मुखपत्रात त्याचा गोषवारा प्रकाशित केला. या सल्लागार समिती मध्ये निवड होणे हे अकोल्यासाठी खचितच मानाची बाब आहे. डॉ प्रशांत मुळावकर यांचे समाजातील सर्व घटकातून कौतूक होत आहे.
टिप्पण्या
Congratulations
उत्तर द्याहटवा