Dilip kumar:bollywood:mumbai ट्रेजेडी किंग सुपरस्टार दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड

 

            सुपरस्टार दिलीप कुमार 




मुंबई: ट्रेजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज सकाळी निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाचे डॉ.जलील पारकर यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली. आज बुधवारी (7 जुलै) सकाळी 7.30 वाजता दिलीप कुमार यांचे निधन झाले असल्याचे पारकर यांनी सांगितले. 





दिलीप कुमार यांना पहिल्यांदा ६ जून रोजी ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. तेव्हा त्यांची प्रकृती स्थिर होती. या काळात त्यांच्या निधनाच्या अफवाही पसरल्या होत्या. तेव्हा दिलीप कुमार यांच्या पत्नी जेष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटरवरून ट्विट करत या अफवांचे खंडन केले होते. तसेच दिलीप कुमार यांना ११ जूनला डिस्चार्ज देण्यात आला होता. 




दिलीप कुमार यांना गेल्या काही वर्षांपासून किडणीचा आणि न्यूमोनियाचा त्रास होत होता. दिलीप कुमार यांचा ९४ वा वाढदिवस हा हॉस्पिटलमध्येच साजरा करण्यात आला होता. दिलीप कुमार यांनी भारतीय सिनेसृष्टीला एक पेक्षा एक असे गाजलेले चित्रपट दिले आहेत. यामध्ये नया दौर, मुघल ए आझम, देवदास, राम और शाम, अंदाज, मधुमती आणि गंगा जमुना या चित्रपटांचा समावेश आहे. हे सर्व चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतील माईल स्टोन ठरली आहेत. १९९८ ला त्यांनी किला हा शेवटचा चित्रपट केला होता. आज सकाळी त्याच्या निधनाची बातमी कळताच तमाम भारतीयांनी शोक व्यक्त केला.




टिप्पण्या