Crime news: Maharashtra: मुंबई: डिलिव्हरी बॉयला शिवसैनिकांनी केली मारहाण! चौघांना अटक, दोन फरार

Amazon delivery boy beaten by Shiv Sainiks;Four arrested, two absconding (file photo)




मुंबई: अमेझॉन कंपनीच्या एका डिलिव्हरी बॉयने शिवसैनिकांवर मारहाणीचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला. यानंतर या प्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून, दोघे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबईतील समता नगर पोलीस क्षेत्रातील ही घटना आहे.




दरम्यान, पीडित डिलिव्हरी बॉय राहुल शर्मा याच्या बहिणीने आरोप केला की, पाच तास वाट पाहिल्यानंतर समता नगर पोलिसांनी त्यांची तक्रार ऐकली. त्यानंतर आरोपी विरोधात एफआयआर दाखल केला. 



अशी घडली घटना


कांदिवली पूर्व परिसरात राहणारा राहुल शर्मा हा मंगळवारी दुपारी अॅमेझॉनची ऑर्डर घेऊन जात होता. रस्त्यात पाऊस लागल्याने तो पोयसर परिसरातील शिवसेना शाखा कार्यालयबाहेर असलेल्या छताखाली उभा होता. दरम्यान एका व्यक्तीने राहुल जवळ असलेल्या सामानावर पाय ठेवला. राहुल याने त्या व्यक्तीला सामानावर पाय ठेवू नका असे सांगितले. तेव्हा काही शिवसैनिकांनी राहुल शर्मा याला मारहाण केली. असा घटनाक्रम तक्रारीत नमूद आहे. घटनेचा अधिक तपास समता नगर पोलीस करीत आहेत.



राजकीय वातावरणवर पडसाद


या घटनेमुळे रराज्यातील दोन विरोधी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यां मध्ये समाज माध्यमातून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडणे सुरू आहे.या प्रकरणात वरीष्ठ नेते काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

टिप्पण्या