- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता १०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै, २०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर करण्यात येणार, अशी घोषणा राज्याच्या शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचे राज्य मंडळाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार या उद्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यंदा राज्य शिक्षण विभागाने निकालाच्या गणितासाठी पर्यायी मुल्यांकन निकष लावले आहेत. वर्ग दहावीच्या मुल्यांकन निकषानुसार, वर्ग ९ ची वार्षिक परीक्षा आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यांकन, युनिट टेस्ट आणि प्री-बोर्ड मधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे निकाल तयार करण्यात आला असल्याचे कळते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा